Aaryan Khan: चंदेरी दुनिया ड्रग्जच्या विळख्यात  Saam Tv
मुंबई/पुणे

Aaryan Khan: चंदेरी दुनिया ड्रग्जच्या विळख्यात

बॉलीवूडच्या कलाकारांची लांबलचक यादीच एनसीबीच्या तपासातून समोर आली

सुरज सावंत

मुंबई : जेव्हापासून सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात ड्रग्ज अँगल समोर आला होता. तेव्हापासून बॉलीवूडच्या कलाकारांची लांबलचक यादीच एनसीबीच्या तपासातून समोर आली होती. या प्रकरणात ३५ हून अधिक जणांवर अटकेची कारवाई NCB ने केली आहे. यात काही अभिनेता आणि अभिनेत्रींचा देखील समावेश आहे. तर काहीं कलाकारांना चौकशीला सामोरे लागले होते.

हे देखील पहा-

मात्र, पाच तपास यंत्रणानी तपास करून, सुद्धा सुशांतच्या आत्महत्येचं कारण आजही गुलदस्त्यात आहे. मात्र NCB ने शनिवारी केलेल्या कारवाईतनंतर पून्हा बाँलीवूड भोवती NCB ने चौकशीचा फास आवळला आहे. शनिवारी कार्डिलिया क्रूझमध्ये ड्रग्ज पार्टी होणार असल्याची कूणकूण काही दिवसांपूर्वीच एनसीबीला लागली होती. कारण या पार्टीचे इन्विटेशन इन्स्टाग्रामवर टाकल्यापासून एनसीबी या पार्टीवर लक्ष ठेवून होती. शनिवारी सकाळी ही क्रूझ मुंबईहून सुटणार असल्याने एनसीबीचे अधिकारीही साध्या वेशात क्रूझवर दाखल झाले होते.

मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. सुरवातीला १३ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. मात्र ५ जणांचा गुन्ह्यात सहभाग नसल्याने त्यांना सोडण्यात आले आहे. मात्र, या गुन्ह्यांची इतकी चर्चा रंगण्या मागचे कारण होते ते म्हणजे बाँलीवूडचा सुपरस्टार शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान याला या गुन्ह्यात ताब्यात घेतलं आहे. आर्यन खानसह अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा, नुपूर सारिका, इस्मित सिंग, मोहक जैस्वाल, विक्रांत चोकेर, गोमित चोपडा यांच्यावर NCB ने गुन्हा नोंदवलेला आहे.

या ड्रग्ज पार्टीतून NCB ने ३० ग्राम चरस, २० ग्रँम कोकेन, नशेच्या २५ गोळ्या, विड, १० ग्रँम एमडी जप्त करण्यात आले आहे. NCB च्या या कारवाईतही बाँलीवूड मधील ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानंतर रडारवर असलेल्या बाँलीवूड मधील कलाकारांच्या मागे NCB चा ससेमिरा लागला आहे. चौकशीत आता अन्य बाँलीवूडशी संबधित व्यक्तींची नावे समोर येतात का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

झाड कोसळून आणखी दोघांचा मृत्यू; मुंबईकरांचा वाली कोण? मुर्दाड महापालिकेला कधी जाग येणार?

Pune School: पुणे, पिंपरी-चिंचवडमधील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी

School Holiday: मोठी बातमी! ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह नवी मुंबईतील सर्व शाळांना उद्या सुट्टी

Pune News: कात्रज तलावाच्या कठड्यावरून खाली पडला, ४५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; पुण्यातील धक्कादायक घटना

Maharashtra News Live Update: रत्नागिरी- चिपळूणच्या वाशिष्ठी नदीनं इशारा पातळी ओलांडली

SCROLL FOR NEXT