Drugs Case: घडलेल्या घटनेवर Cordelia Cruiseचं स्पष्टीकरण

मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या लक्झरी क्रूझमध्ये ड्रग पार्टी होत होती
Drugs Case: घडलेल्या घटनेवर Cordelia Cruiseचं  स्पष्टीकरण
Drugs Case: घडलेल्या घटनेवर Cordelia Cruiseचं स्पष्टीकरणSaam Tv
Published On

मुंबई : मुंबईहून गोव्याकडे (Mumbai To Goa) जाणाऱ्या लक्झरी क्रूझमध्ये (Cruz Drugs Party) ड्रग पार्टी होत होती, ज्यावर NCB ने धाड टाकली आहे. ज्या जहाजामध्ये ही पार्टी चालू होती. त्या Cordelia Cruises ने त्यावर स्पष्टीकरण दिले आहे. NCB नेन ज्या कॉर्डेलिया क्रूझवर कारवाई करत ड्रग्ज पार्टीसाठी ८ जणांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेशी Cordelia Cruises चा कोणत्याही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे या घटनेशी संबंधित नाही. कॉर्डेलिया क्रूझने आपले जहाज एका खासगी कार्यक्रमासाठी दिल्ली स्थित इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला भाड्याने देण्यात आले होते. Cordelia Cruises या संपूर्ण घटनेचा निषेध करत आहेत. या पुढे अशा घटना होणार नाही यासाठी आम्ही काळजी घेऊ. तपास यंत्रणेला आम्ही पूर्ण पणे सहकार्य करू असे स्पष्टीकरण कॉर्डेलिया क्रूझकडून देण्यात आले आहे.

हे देखील पहा-

दरम्यान बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा (Aryan Khan) मुलगा आर्यनचे नावही पार्टीमध्ये समोर आले आहे. आता आर्यन खान सह 8 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मूनमून धमेचा, नुपूर सारिका, यास्मित सिंग, मोहक जयस्वाल, विक्रांत चोकर, गोमित चोप्रा, आर्यन खान, अरबाज मर्चंट या आठ जणांवर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. त्याची एनसीबी टीमकडून चौकशी केली जात होती. एनसीबी मुंबईचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी आर्यनच्या चौकशीला दुजोरा दिला होता. त्यांनी सांगितले आहे की ज्या लोकांची चौकशी केली जात आहे. त्यात शाहरुखचा मुलगा आर्यनचा समावेश आहे.

Drugs Case: घडलेल्या घटनेवर Cordelia Cruiseचं  स्पष्टीकरण
खळबळजनक; उपसरपंचाच्या जाचाला कंटाळून ग्रामसेवकाची आत्महत्या

एनसीबीच्या चौकशीत आर्यनने असाही दावा केला आहे की, त्या पार्टीमध्ये त्याला आमंत्रित करण्यात आले होते. सूत्रांनी असेही सांगितले की क्रूझच्या आत जात असलेल्या पार्टीचा एक व्हिडिओ एनसीबीने मिळाला आहे, ज्यामध्ये आर्यन दिसत आहे. पार्टी दरम्यान आर्यनने पांढरा टी-शर्ट, निळी जीन्स, लाल ओपन शर्ट आणि टोपी घातली होती. एनसीबीशी संबंधित सूत्रांकडून असेही समजले आहे की ज्यांना पकडले गेले आहे, त्यांच्याकडून रोलिंग पेपर देखील सापडले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com