खळबळजनक; उपसरपंचाच्या जाचाला कंटाळून ग्रामसेवकाची आत्महत्या
अहमदनगर : उपसरपंचाच्या जाचाला कंटाळून ग्रामसेवकाने आत्महत्या Gramsevak commits suicide केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील खांडगाव- वडघुल या गट ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक झुंबर मुरलीधर गवांदे यांनी सौताडा धबधब्यावरुन उडी घेऊन 24 सप्टेंबर दिवशी आत्महत्या केली होती.
हे देखील पहा-
या प्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. ज्या ठिकाणी ग्रामसेवक झुंबर मुरलीधर गवांदे यांनी आत्महत्या केली होती. त्या धबधब्यावर घटनास्थळी गवांदे यांची बॅग, आयकार्ड, मोटरसायकल मिळाली होती. मात्र ८ दिवसांपासून मृतदेहाचा शोध सुरू होता. ८ दिवसांनी आत्महत्या केलेल्या ग्रामसेवकाचा मृतदेह आढळून आला आहे. काल दुपारी त्यांची बॉडी सापडली होती.
या प्रकरणी बीड तालुक्यातील सौंदांडा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मात्र, खांडगाव- वडघुलचे उपसरपंच राम घोडके यांच्या त्रासला कंटाळून गवांदे यांनी आत्महत्या केल्याचा आरोप होत आहे. दोषींवर कारवाईचे करण्याची मागणी मयताच्या पत्नीने केली आहे. या प्रकरणातील उपसरपंच राम घोडके आणि ग्रामसेवक झुंबर गवांदे यांच्या संभाषणाच्या रेकॉर्डिंग व्हायरल झाले आहे.
व्हायरल झालेल्या या रेकॉर्डिंगमध्ये गावातील फॉरेस्ट हद्दीत असलेल्या १५० घरांची नियमबाह्य नोंद लावण्याकरिता उपसरपंच राम घोडके यांच्याकडून ग्रामसेवक झुंबर गवांदे यांच्यावर दबाव टाकण्यात आला होता. यासोबतच त्यांची इतरही काही कामे घोडके यांनी सांगितले होती. ती करण्याकरिता उपसरपंच राम घोडके हे दबाव टाकत असत.
ग्रामसेवक झुंबर गवांदे यांच्या विरोधात उपसरपंच रामा घोडके यांनी वरिष्ठांकडे तक्रार देखील करण्यात आली होती. तक्रार मागे घ्यायची असेल तर ही कामे करा असे संभाषण आहे. या घटनेमुळे संपूर्ण नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणी पोलीस नेमकी काय कारवाई करतात हे पहावं लागणार आहे.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.