Aarey To Goregaon Ropeway Saam Tv
मुंबई/पुणे

Aarey Rope Way : आरे ते फिल्मसिटीपर्यंत 'रोप वे'ने झटक्यात जा, वेळ अन् पैसा वाचणार, वाचा नेमका प्लॅन काय आहे?

Aarey To Goregaon Filmcity Rope Way: आरे ते गोरेगाव फिल्म सिटीदरम्यान लवकरच रोप वे सुरु होणार आहे. यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन पर्यटनाला चालना मिळणार आहे.

Siddhi Hande

आरे ते गोरेगाव फिल्मसिटीपर्यंत होणार रोपवे

वाहतुकीचा ताण आणि पर्यटनाच्या विकासाच्या दृष्टीने पाऊल

प्रस्ताव देण्यात आला असून लवकरच कामाला सुरुवात होईल

मुंबईत वाहतूक कोंडीची खूप मोठी समस्या आहे. मुंबईकरांची वाहतूक कोडींपासून सुटका करण्यासाठी अनेक मार्ग काढले आहेत. आता वाहतुकीचा ताण आणि पर्यटनाचा विकास अशा दोन्ही गोष्टींचा समन्वय साधणारा प्रस्ताव चर्चेत आला आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने आरे मेट्रोस्थानक ते गोरेगाव फिल्मसिटीदरम्यान रोप वे सुरु करण्याचा विचार केला आहे.

आरे ते गोरेगाव फिल्मसिटी रोप वे

आरे मेट्रो स्टेशन ते गोरेगाव फिल्मसिटी हा रोपवे दोन ते तीन किलोमीटर लांबीचा आहे. या मार्गामुळे संजय गांधी नॅशनल पार्क,फिल्मसिटी आणि आरेपर्यंतचा प्रवास अधिक सोपा आणि जलद होणार आहे.

प्रदुषणाशिवाय होणार वाहतूक

या रोपवेच्या माध्यमातून दर तासाचा २००० ते ३००० प्रवासी प्रवास करु शकतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा रोपवे आरे कॉलनी ते फिल्मसिटीपर्यंत मर्यादित न ठेवता तो संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. यामुळे पर्यटन वाढले. याशिवाय पर्यटनाच्या क्षेत्रातील वाहतूक ही विनाप्रदुषणाशिवाय होणार आहे. याचसोबत वाहतूक कोंडीपासूनदेखील सुटका होईल.

गोरेगाव ते आरे कॉलनी या परिसरात खूप जास्त वाहतूक कोंडी असते. या मार्गावर सार्वजनिक वाहतूक जास्त नसल्याने पर्यटक आणि स्थानिक रहिवाशांना त्रास होतो. रोपवे सेवा सुरु झाल्याने जलद आणि सुरक्षितरित्या प्रवास होईल. याचसोबत प्रदुषणदेखील होणार नाही. या नवीन रोप वे मार्गामुळे स्थानिक रहिवाशांसोबत पर्यटकांनाही फायदा होणार आहे. हा रोप वे बनवण्यासाठी प्रस्ताव देण्यात आला आहे. या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर याचे काम सुरु होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : गडचिरोलीत कौटुंबिक कलहातून पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

Krantijyoti Vidyalay Collection : 'क्रांतीज्योती विद्यालय...' बॉक्स ऑफिसवर सुसाट, अमेय वाघच्या चित्रपटानं आठवड्याभरात कमावले तब्बल 'इतके' कोटी

BP चा त्रास होईल कमी; आत्ताच 'या' ४ सवयी करा फॉलो, डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

Archana Puran Singh: अर्चना पूरण सिंगला झाला 'हा' गंभीर आजार; मुलाने भावूक होऊन केला खुलासा

Fashion Tips 2026: 'कपडे मोठे पण दिसाल स्टायलिश', हे आहेत 5 ट्रेडिंग ओव्हरसाईज्ड कपडे पॅटर्न

SCROLL FOR NEXT