Mumbai Metro Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Metro : मेट्रो-३ च्या प्रवाशांसाठी मासिक पास उपलब्ध, किती पैसे खर्च करावे लागणार?

Mumbai Metro 3 Aarey To Cuffeparade Monthly Pass : मुंबई मेट्रो-३ मार्गिकेवर दैनंदिन प्रवाशांसाठी मासिक पास सेवा सुरू करण्यात आली आहे. ६० ट्रिपवर १५% आणि ४५ ट्रिपवर १०% सवलतीमुळे प्रवाशांना मोठी बचत होणार असून ही सुविधा पूर्णपणे डिजिटल आहे.

Alisha Khedekar

  • मेट्रो-3 वर मासिक पास सेवा अधिकृतपणे सुरू

  • ६० व ४५ ट्रिप पासवर सवलत देऊन बचत सुनिश्चित

  • डिजिटल अॅपमुळे तिकीट काढण्याचा त्रास संपणार

  • मुंबईतील दैनंदिन प्रवासी व नोकरदारांसाठी फायदेशीर

मेट्रो प्रवाशांसाठी गुड न्यूज! आता मेट्रो ३ मार्गिकेवर प्रवाशांना लोकलप्रमाणे दैनंदिन प्रवाशांसाठी मासिक पास सुविधा अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. मासिक पास सुविधा २८ नोव्हेंबरपासून प्रवाशांसाठी सुरु करण्यात आली आहे. मेट्रो कनेक्ट-3 अॅपवरून हे पास खरेदी करता येणार असून यामुळे प्रवाशांना मासिक पास योजनांमध्ये पैशांची मोठी बचत होणार आहे.

मुंबईच्या आरे ते कफ परेड दरम्यान धावणाऱ्या भुयारी मेट्रो ३ मार्गिकेवर २८ नोव्हेंबरपासून म्हणजेच काल पासून दैनंदिन प्रवाशांसाठी मासिक पासची सेवा सुरु करण्यात आली आहे. नव्या योजनेनुसार प्रवाशांना दरमहा ६० ट्रिप पासवर १५ टक्के सवलत मिळणार आहे, तर ४५ ट्रिप पासवर १० टक्के सवलत देण्यात येणार आहे. या सुविधेमुळे नोकरदार वर्गाला सर्वात जास्त फायदा होणार आहे.

विशेष म्हणजे पास खरेदी प्रक्रिया अतिशय सोपी आणि पूर्णपणे डिजिटल आहे. मेट्रो-3 ही देशातील पहिली अशी मेट्रो व्यवस्था आहे जिथे मोबाइल अॅपद्वारे मासिक पासची सुविधा देण्यात आली आहे. आतापर्यंत दिव्यांग प्रवाशांसाठीच सवलतीची योजना सुरू करण्यात आली होती. पण आता सर्वसामान्य प्रवाशांसाठी देखील नियमित प्रवास अधिक स्वस्त आणि सोयीस्कर करण्याची पावले उचलण्यात आली आहेत.

एमएमआरसीएने सांगितले की, दररोजचं तिकीट काढण्याचा त्रास टाळण्यासाठी आणि प्रवास अधिक किफायतशीर करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. दररोज लाईन मध्ये उभं राहण्याचा त्रास आता संपावा आणि डिजिटल पद्धतीने झटपट व्यवहार व्हावा हा या योजनेचा मुख्य हेतू आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुणे हादरले! दिराकडून भावजयीवर जीवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार

Pre Primary School: नोंदणी अनिवार्य ! पूर्व प्राथमिक शाळांसाठी सरकार आणणार नवा कायदा

केरळमध्ये कमळ फुलवण्यासाठी भाजप लागली कामाला ;महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यावर सोपवली मोठी जबाबदारी

Beed Crime: जमीन-ट्रॅक्टरसाठी नातं विसरला; जन्मदात्यासह बहीण आणि मेहुण्याला लोखंडी पाईपनं बेदम मारहाण

Rahuri By-Election: पवारांच्या नेत्याकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक, राहुरी पोटनिवडणुकीवरून राजकारण तापलं?

SCROLL FOR NEXT