Aaditya thackeray Tweet Saam tv
मुंबई/पुणे

Aaditya thackeray Tweet: ...तोपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावर कोकणवासीयांचा प्रवास सुखकर होणार नाही; आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले

Aaditya thackeray : मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून आमदार आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.

Vishal Gangurde

Aaditya thackeray News: कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरला केला जातो. या उत्साहासाठी कोकणवासीय मोठ्या संख्येने मुंबई-गोवा महामार्गावरून कोकणात जात असतात. या कोकणवासीयांना यंदा महामार्गावरील रखडलेले चौपदरीकरण आणि पडलेल्या खड्ड्यांमधून प्रवास करावा लागत आहे. या मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून आमदार आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)

मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यावरून आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, 'गणेशोत्सव जवळ आलाय, कोकणचा चाकरमानी बांधव कोकणात जायला निघणार आणि रस्त्यांची अवस्था मात्र चंद्रावर पडलेल्या खड्ड्यांसारखी! प्रवास सुखकर होणं अशक्य'.

'पालकमंत्रिपदासाठी आपापासात भांडत बसलेल्या आणि अहंकाराने फुगलेल्या खोके सरकारमधल्या आमदारांना स्वतःच्या मतदारसंघातून जाणाऱ्या महामार्गाचा प्रश्न सोडवता येत नाही? पाठीशी असलेली महाशक्तीही मदतीला येत नाही? अशा लोकांना कोकणी माणूस इंगा दाखवणार, असेही ते म्हणाले.

मुंबई-गोवा महामार्गावर टँकर उलटला

मुंबई-गोवा महामार्गावर टँकर उलटल्याची घटना घडली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. यामुळे काही प्रमाणात एकेरी वाहतूक सुरू आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

पोलिसांनी टँकरमधील ज्वलनशील पदार्थामुळे सुरक्षेच्या कारणास्तव घाटातील वाहतूक थांबवली आहे. अडीच तास महामार्गावरील वाहतूक विस्कळीत आहे. महामार्गावर उलटलेला टँकर बाजूला काढण्यासाठी तीन क्रेन दाखल झाले आहे.

या अपघातामुळे फायर ब्रिगेडची टीम देखील घटनास्थळी दाखल झाली आहे. क्रेनच्या सहाय्याने टँकर हटवण्याचं काम सुरु आहे. या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे.

मुंबई-गोवा महामार्गाची दुरावस्था, पत्रकारांनी खड्ड्यात लोळून केलं आंदोलन

मुंबई गोवा महामार्गाचे रखडलेले चौपदरीकरण आणि पडलेले खड्डे यामुळे चर्चेत येणारा मुंबई गोवा महामार्ग पुन्हा एकदा चर्चेत आत आला आहे. दोन दिवसांपूर्वी एका सिव्हिल इंजिनिअर तरुणाने आणि रायगडमधील पत्रकारांनी महामार्गावरील खड्ड्यात लोळून आंदोलन केले. मुंबई गोवा महामार्गाच्या या दुरावस्थेला सर्वपक्षीय राजकर्ते जबाबदार असल्याची प्रतिक्रिया या निमित्ताने ऐकायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navi Mumbai Metro: नवी मुंबईत आणखी एक मेट्रो धावणार! तळोजा ते खांदेश्वर, असा असणार मार्ग, स्थानके कोणती? वाचा

Maharashtra Live News Update : राज्यावर अवकाळीचे सावट; 17 ते 20 मार्चदरम्यान पावसाचा अंदाज

Eye Care: चष्म्याचा नंबर कमी करायचा आहे? मग डॉक्टरांनी सांगितलेले 'हे' ७ फळ ठरतील वरदान

Rice health benefits: रात्री भात खाल्ल्यानं खरंच वजन वाढतं का? हा समज की गैरसमज?

Saree Tips : फक्त ५ मिनिटांत चापूनचोपून साडी नेसाल; 'ही' स्मार्ट ट्रिक वापरा, समारंभात मस्त मिरवा

SCROLL FOR NEXT