A youth was killed by two persons in Ganesh Peth area incident in Pune city Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News: पुण्यात 'मुळशी पॅटर्न'चा थरार, कोयत्याने सपासप वार करत तरुणाची हत्या; परिसरात खळबळ

Pune Crime News: किरकोळ वादामधून एका तरुणाची कोयत्याने सपासप वार करून हत्या करण्यात आली. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Satish Daud

अक्षय बडवे, साम टीव्ही

Pune Latest Crime News

मागील काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी मोहिम आखली आहे. अशातच पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादामधून एका तरुणाची कोयत्याने सपासप वार करून हत्या करण्यात आली. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सिद्धार्थ नंदकुमार हादगे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पुण्यातील (Pune News) गणेश पेठेतील ओसवाल बिल्डिंगच्या छतावर मध्यरात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत दोन आरोपींनी अटक केली आहे. या घटनेनं परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृक सिद्धार्थ आणि आरोपींमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादातून आरोपींनी सिद्धार्थची हत्या करण्याचा प्लान आखला. रविवारी रात्री आरोपींनी शहरातील फरासखाना पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीत सिद्धार्थला गाठलं आणि मारहाण सुरू केली.

सिद्धार्थने आरोपींच्या तावडीतून सुटका करत पळ काढला. तेव्हा आरोपी त्याच्या पाठीमागे कोयते घेऊन लागले. जीव वाचवण्यासाठी सिद्धार्थ ओसवाल बिल्डिंगच्या छतावर गेला. मात्र, आरोपींनी त्याला पाठलाग करत गाठलं. जीव वाचवण्यासाठी सिद्धार्थ आरोपींकडे माफीची याचना करत होता.

पण, आरोपींनी कुठलीही दयामाया न दाखवता त्याच्यावर कोयत्याने सपासप वार केले. या घटनेत सिद्धार्थच्या अंगावर गंभीर जखमा झाल्या. अतिरक्तस्राव झाल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. दरम्यान, ओसवाल बिल्डिंगवर हत्या झाल्याची घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरली. घटनेनंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Revdi Recipe: गूळ व तीळापासून तयार होणारी खमंग रेवडी एकदा घरी नक्की बनवा, नोट करा सिंपल रेसिपी

Pune : आषाढी एकादशीच्या दिवशी काळाचा घाला! पंढरपूरहून परतताना अपघात, टँकरची दुचाकीला धडक अन्...; हसताखेळता संसार उद्धवस्त

Food Digestion: खाल्लेले अन्न पचायला किती वेळ लागतो?

Farali Misal Recipe : झणझणीत फराळी मिसळ, उपवासाला एकदा करून तर बघा

Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

SCROLL FOR NEXT