पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाठवण्यात येणाऱ्या सामानाची चोरी Saam Tv news
मुंबई/पुणे

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पाठवण्यात येणाऱ्या सामानाची चोरी

बहुजन विकास आघाडीच्या महिला कार्यकर्त्या नीलम गायकवाड यांनी चिपळूणमधील पूरग्रस्तांसाठी जमा करण्यात आलेले हे समान चोरी करुन स्वतःच्या घरी साठवून ठेवले.

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

वसई/विरार : चिपळूणमधील पूरग्रस्तांसाठी महिला वस्तीस्तर बचत गटांकडून जमा करण्यात आलेले सामान चोरी केल्याची घटना घडली आहे. नालासोपाऱ्यामधील स्थानिक बहुजन विकास आघाडी पक्षाच्या महिला कार्यकर्तीने पुरग्रस्तांच्या मदतीचे सामान चोरी करून स्वतःच्या घरात साठवून ठेवल्याची घटना उघडकीस आली आहे. (A woman activist of 'BVA' stole goods sent for flood victims)

हे देखील पहा -

कोकणात पावसाने हाहाकार माजवत चिपळूण आणि महाड मध्ये अतिवृष्टी झाली. त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन हजारो कुटंब निराधार झाले. महाराष्ट्राच्या कान्या-कोपऱ्यातून या पूरग्रस्तांना मदतीचे हात पुढे आले. यामध्ये वसई-विरार आणि नालासोपारा मधील महिला वस्तीस्तर बचतगटाच्या 330 महिलांनी पुढाकार घेत पुग्रस्तांना मदत म्हणून जीवनावश्यक वस्तू गोळा केल्या. नालासोपाऱ्यातील बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्या नीलम गायकवाड नामक महिलेने चिपळूण पूरग्रस्तांसाठी आलेली मदत स्वरूपी संपूर्ण समान स्वतःच्या घरी साठवून ठेवत लुबाडण्याची घटना समोर आली आहे.

बहुजन विकास आघाडी कार्यकर्ता नीलम गायकवाड यांचा हा प्रताप उघडकीस आल्यानंतर महिला वस्तीस्तर बचतगट कमिटीने त्यांच्याकडे चौकशी केली असता, नीलम गायकवाड यांनी परिसरातील आदिवासी महिला सामान चोरी करत असतील अशी उडवा-उडवीची उत्तरे देत आदिवासी समाजाला बदनाम करण्याचं काम केलं गेलं असं सांगण्यात येत आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

SCROLL FOR NEXT