एसटी कामगारांच्या संपावर आज निघणार तोडगा? शरद पवारांच्या उपस्थितीत बैठक Saam Tv
मुंबई/पुणे

एसटी कामगारांच्या संपावर आज निघणार तोडगा? शरद पवारांच्या उपस्थितीत बैठक

आज एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघणार का याकडे सर्वाधिक लक्ष लागून राहिले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत

मुंबई: राज्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरु असलेल्या संपाला आता २ महिन्यांपेक्षा जास्त वेळ झाला आहे. काही कर्मचारी कामावर परतले आहेत, तरी अजून देखील काही एसटी कर्मचारी संपातून माघार घ्यायला तयार नाहीत. आज एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST workers) संपावर तोडगा निघणार का याकडे सर्वाधिक लक्ष लागून राहिले आहे. राष्ट्रवादीचे खासदार शरद पवारांच्या (Sharad Pawar) उपस्थितीमध्ये एसटीच्या कृती समितीची बैठक होणार आहे. शरद पवार आणि संपकरी कर्मचारी आणि एसटी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास ही बैठक होणार आहे.

हे देखील पहा-

या बैठकीमध्ये परत एकदा एसटी महामंडळ विलीनिकरणाची मागणी समोर ठेवून त्याविषयी चर्चा होणार आहे. शरद पवारांबरोबर परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) देखील या बैठकीमध्ये उपस्थित राहणार आहेत. गेल्या २ महिन्यांपासून पगार वाढ देऊन देखील सुद्धा कर्मचारी संपामधून माघार घेण्यास तयार नसल्यामुळे या बैठकीमध्ये नेमका यावर काय तोडगा काढला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

महत्वाचे म्हणजे संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर ज्या कारवाई करण्यात आले आहेत. त्या कारवाया मागे घेण्याविषयी कर्मचारी संघटनांकडून मागणी केली जाणार आहे. संपाची नोटीस दिलेल्या महाराष्ट्र (Maharashtra) राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी एसटी कर्मचारी संघटनेने संपातून माघार घेऊन देखील एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाशिवाय माघार न घेण्याची भूमिका हाती घेतल्यामुळे अद्याप एसटीची सार्वजनिक सेवा सुरू होऊ शकली नाही. एसटी कर्मचाऱ्यांचा संप नेतृत्वहीन असल्यामुळे राज्य सरकारने चर्चा तरी कोणाशी बरोबर करायची, असा पेच निर्माण झाला आहे.

याअगोदर कृती समितीशी चर्चा करून घरभाडे, महागाई भत्त्याची वाढ देण्यात आली होती. त्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar), सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्याशी चर्चा करून वेतनवाढ करण्यात आले होते, तर संपकरी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर यांच्याशी चर्चा करून संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर झालेल्या कारवाई मागे घेण्यात आली. त्यानंतर देखील एसटी कर्मचारी मात्र, अद्याप संपावर कायम आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

SCROLL FOR NEXT