Bus Navi Mumbai Saam
मुंबई/पुणे

Navi Mumbai: धावत्या एसी बसमध्ये कपलचे शरीरसंबंध; Video व्हायरल झाल्यानंतर गुन्हा, तरूण-तरुणीला काय शिक्षा होऊ शकते?

Navi Mumbai Couples Viral AC Bus Video Sparks Outrage: एनएमएमटीच्या वातानुकूलित बसमध्ये एका कपलनं शरीरसंबंध ठेवले होते. या कपलविरोधात आता गुन्हा दाखल झाला असून, कारवाई होण्याची शक्यता आहे.

Bhagyashree Kamble

नवी मुंबईतील कपलचा धावत्या एसीमधील व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. हे कपल एनएमएमटी बसमध्ये शारीरिक संबंध ठेवत होते. यादरम्यान एका व्यक्तीने व्हिडिओ शूट करून शेअर केला. २२ सेकंदाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. त्यानंतर कंडक्टरविरोधात निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच कामोठे पोलिसांनी कपलविरोधात मोठी कारवाई केली. या प्रकरणात त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली असून, कारवाई करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबईतील एका प्रेमी युगुलाच्या व्हिडिओमुळे खळबळ माजली आहे. हे कपल एनएमएमटी बसमधून कल्याण ते पनवेलच्या दिशेनं जात होती. वातानुकूलित बसमध्ये कुणीही नसल्याचा फायदा घेत आयजीपीएल कपंनी मार्गादरम्यान कपल शरीरसंबंध ठेवत होते. या दरम्यान बस कळंबोली सर्कलला थांबली, आणि त्यावेळी एका व्यक्तीने पाहिलं. त्याने तातडीने व्हिडिओ शूट करून शेअर केला. तरूणाचे वय २० तर, तरूणीचे १९ असल्याची माहिती समोर आली आहे.

व्हायरल व्हिडिओनंतर एसी बसमधील कंडक्टरने कपलविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी कपलविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम २९६ अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. दाखल केलेल्या तक्रारीनुसार, कपलला ३ महिन्यांपर्यंत तुरूंगवासाची शिक्षा होऊ शकते. किंवा त्यांना १००० रूपयांपर्यंत दंड भरावा लागेल. या दोन्हीपैकी एक शिक्षा त्यांना होऊ शकते.

कंडक्टरविरोधातही कारवाईची शक्यता

नवी मुंबईतील एनएमएमटीच्या वातानुकूलीत बसमध्ये एक प्रेमीयुगुल नको ते कृत्य करताना कॅमेऱ्यात कैद झाले होते. त्यांचा २२ सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कंडक्टरविरोधात कारवाई सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. प्रेमी युगुल नको ते कृत्य करत असताना कंडक्टरांचं लक्ष नेमकं कुठे होतं? त्यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत कारवाई होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

Bihar Politics: राजकीय वर्तुळात शांतता असताना बिहारमध्ये मोठी घडामोड; माजी सीएमच्या मुलानं थोपटले दंड

SCROLL FOR NEXT