mumbai Mega block news saam tv
मुंबई/पुणे

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! 'या' दिवशी तब्बल २७ तासांचा मेगा ब्लॉक; प्रवाशांची होणार गैरसोय

मुंबईकरांनी 'या' दिवशी जर एखादे महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भूषण शिंदे

मुंबई - पुढील आठवड्यातील रविवारी म्हणजेच २० नोव्हेंबर रोजी मुंबईकरांनी (Mumbai) जर एखादे महत्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडावे आणि याचे कारण आहे मध्य रेल्वेवरील तब्बल २७ तासांचा मेगा पॉवर ब्लॉक (Mega Block). मस्जिद बंदर स्थानका जवळील साधारण १०० वर्ष जुना असलेला कर्नाक ओव्हर ब्रिज हटवण्याचे काम मध्य रेल्वे करणार आहे. शनिवारी रात्री ११ वाजता हा ब्रिज हटवण्याचे काम सुरु होईल आणि सोमवारी मध्यरात्री २ वाजेपर्यंत हे ब्रिज हटवण्याचे काम पूर्ण होणार आहे.

या २७ तासांच्या मेगा पॉवर ब्लॉक दरम्यान मध्य रेल्वे वरील भायखळा ते सीएसएमटी आणि हार्बर मार्गावरील वडाळा ते सीएसएमटी दरम्यान रेल्वे वाहतूक ही सेवा संपूर्ण बंद असणार आहे. तसेच या दोन दिवसातील तब्बल ३६ लांब पल्याचा गाड्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत. तर अनेक गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. सोमवारी पहाटे रेल्वे वाहतूक सुरळीत होईल अशी अपेक्षा मध्य रेल्वे ने व्यक्त केली आहे.

ब्लॉक कालावधी

अप आणि डाउन धिम्या मार्गावर: शनिवार दि. १९.११.२०२२ रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते रविवार दि. २०.११.२०२२ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. या ठिकाणी तब्बल १७ तासांचा ब्लॉक असणार आहे.

अप आणि डाउन जलद मार्गावर: शनिवार दि. १९.११.२०२२ रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते रविवार दि. २०.११.२०२२ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. या ठिकाणी तब्बल १७ तासांचा ब्लॉक असणार आहे.

अप आणि डाउन हार्बर मार्गावर: शनिवार दि. १९.११.२०२२ रोजी रात्री ११ वाजल्यापासून ते रविवार दि. २०.११.२०२२ रोजीच्या रात्री ८ वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणार आहे. या ठिकाणी तब्बल २१ तासांचा ब्लॉक असणार आहे.

उपनगरीय गाड्यांचे रद्दीकरण:

• ब्लॉक कालावधीत उपनगरीय सेवा भायखळा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान मुख्य मार्गावर आणि हार्बर मार्गावरील वडाळा रोड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान उपलब्ध राहणार नाहीत.

• मुख्य मार्गावरील अप आणि डाउन उपनगरीय सेवा भायखळा, परळ, दादर आणि कुर्ला स्थानकांवर शॉर्ट टर्मिनेट/शॉर्ट ओरीजनेट होतील. भायखळा, परळ, दादर, कुर्ला ते ठाणे आणि त्यापलीकडे उपनगरीय गाड्या कमी वारंवारतेने चालवल्या जातील.

• हार्बर लाईनवरील अप आणि डाउन उपनगरीय सेवा वडाळा रोड स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट/शॉर्ट ओरीजनेट केल्या जातील. वडाळा रोड ते कुर्ला आणि त्यापलीकडे उपनगरीय गाड्या कमी वारंवारतेने चालवल्या जातील.

• रविवारी चालणाऱ्या वातानुकूलित उपनगरी सेवा उपलब्ध नसतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result: बारामतीचा दादा 'अजितदादा'! लोकसभेला काका, विधानसभेला पुतण्या

Mahrashtra Election Result : हूश्श! अखेर रोहित पवार विजयी झाले

Maharashtra Election Results: अजित पवारांचे शिलेदार चमकले! पाहा दादांच्या राष्ट्रवादीच्या ४१ विजयी आमदारांची संपूर्ण यादी

PM Narendra Modi : 'एक है, तो सेफ है'; महाराष्ट्रातील विधानसभा निकालानंतर PM नरेंद्र मोदींनी पुन्हा दिला नारा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: महायुतीच्या विजयाचं दिल्लीत सेलिब्रेशन

SCROLL FOR NEXT