Corona: काळात सुरु झालेल्या गाड्यांबाबत रेल्वेचा मोठा निर्णय Saam Tv
मुंबई/पुणे

Corona: काळात सुरु झालेल्या गाड्यांबाबत रेल्वेचा मोठा निर्णय

कोरोना पूर्वीच्या १७०० ट्रेन नियमितपणे चालवले जाणार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : कोरोना पूर्वीच्या १७०० ट्रेन नियमितपणे चालवले जाणार आहेत. कोरोना काळात विशेष रेल्वे, विशेष दर बंद होणार आहेत. रेल्वेचे तिकीट दर अगोदरप्रमाणेच आकारण्यात येत आहेत. कोरोना नियंत्रणामध्ये आल्याने रेल्वे मंत्रालयाने हा मोठा निर्णय घेतला आहे. देशभरात कोरोनाचा Coronavirus उद्रेक कमी झाला आहे.

तसेच कोरोना रुग्णांमध्ये घट झाल्यानंतर, सरकारने संपूर्ण देशभरात सामान्य रेल्वे सेवा पूर्णपणे पूर्ववत करण्याची घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे कोरोना येण्याअगोदर देशात धावणाऱ्या १७०० एक्स्प्रेस आणि सुपरफास्ट गाड्या परत एकदा धावू लागणार आहेत. यासाठी सरकारने CRIS ला सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक बदल करण्यास सांगितले आहे.

हे देखील पहा-

रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, कोरोनाच्या Corona पार्श्वभूमीवर कोविड स्पेशल, एक्सप्रेस स्पेशल किंवा हॉलिडे स्पेशल म्हणून, ज्या गाड्या चालवले जात होते. त्यांची सेवा आता नेहमीच्या गाड्यांसारखी असणार आहे. म्हणजेच या सर्व गाड्या त्यांच्या जुन्या नियमित क्रमांकासह आणि वेळेनुसार रुळांवर आता धावणार आहेत. यामुळे कोरोनापूर्वीचे रेल्वे भाडे परत लागू होणार आहेत.

मंत्रालयाच्या या आदेशावर मागील दीड वर्षांपासून बंद करण्यात आलेल्या सुमारे १७०० सुपरफास्ट Mail Express आणि एक्सप्रेस गाड्या परत एकदा सुरू करण्यात येणार आहेत. मात्र, या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्यांना मास्क, सोशल डिस्टन्सिंग यांसारख्या कोरोना प्रोटोकॉलचे पालन करावे लागणार आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj and Uddhav Thackeray: ठाण्यात शिंदेंविरोधात ठाकरे बंधू एकत्र, संजय राऊतांनी केली मोठी घोषणा

Maharashtra Politics : नाशिकमध्ये वातावरण फिरलं; भाजपला मोठा धक्का, बडा नेता ठाकरे गटात जाणार

नवऱ्याने जिंकली १२ कोटी रुपयांची लॉटरी, नंतर लाईव्ह स्ट्रीमवर महिलांवर उडवले सगळे पैसे; बायकोने थेट...

Maharashtra Live News Update : लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला पंढरपूरचा चंद्रभागातीर...

Chhagan Bhujbal: आरक्षणाचा लढा, नेतृत्वावर घसरला? बीडच्या सभेत भुजबळांकडून लाव रे तो व्हिडीओ

SCROLL FOR NEXT