Thane Crime
Thane Crime Saam Tv
मुंबई/पुणे

मुंब्र्यात लहान मुलांकडून चोरी करून घेणारी महिलांची टोळी सक्रीय, घटना CCTVमध्ये कैद

कल्पेश गोरडे

ठाणे : ठाण्यातील (Thane) मुंब्रा परिसरात लहान मुलांकडून चोरी करून घेणारी टोळी सक्रीय झाली आहे. मुंब्रा (Mumbra) येथील गुलाब पार्क मार्केटमध्ये नुकताच याचा प्रत्यय आला आहे. परिसरातील एका दुकानात काही महिला आल्या होत्या त्यावेळी त्यांनी सोबत एक लहान मुलगी देखील आणली होती. यावेळी महिलांनी दुकानदाराला बोलण्यात गुंतवून ठेवले. तर दुसरीकडे या लहान मुलीने दुकानातील गल्ल्यामधील ११ हजार रुपये लंपास केले. पैसे काढल्यानंतर या सगळ्या महिलांनी दुकानातून पोबारा केला.

ठाण्यातील मुंब्रा परिसरातील गुलाब पार्क मार्केट परिसरात असलेल्या सागर कॉस्मेटिक या होलसेल दुकानात ही चोरीची घटना घडली आहे. या दुकानात ४ महिला खरेदी करण्याच्या बहाण्याने आल्या. तेव्हा त्यांच्यासोबत एक लहान मुलगी देखील होती. दुकानातून सामान घेण्याच्या बहाण्याने या महिलांनी सदरील दुकानमालकाला बोलण्यात गुंतवून ठेवलं. याचाच फायदा घेत त्यांच्या सोबत आलेल्या एका लहान मुलीने दुकानाच्या गल्ल्यावर डल्ला मारला.

दुकानमालक महिलांसोबत बोलत असताना या लहान मुलीने सोबत असलेल्या महिलेच्या हातातून पिशवी घेतली. तसेच दुकानमालकाच्या गल्ल्यातून तिने तब्बल ११ हजार रुपये लंपास केले. पैसे चोरी करण्याची आपली योजना पूर्ण झाल्यानंतर सदरील महिलांनी एकमेकांना खुनवा खुणवी करत दुकानातून पोबारा केला. दरम्यान, चोरीचा हा संपूर्ण प्रकार दुकानात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. याबाबत पोलिसांत तक्रारही देण्यात आली आहे. महिला चोरट्यांच्या सक्रिय टोळीमुळे मुंब्रा येथील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : खालच्या पातळीवरचं राजकारण केवळ भाजपच करू शकतं; आदित्य ठाकरे

Pune News | गुप्तांगावर बॉल लागल्याने चिमुकल्याचा मृत्यू

ICC Women's T20 WC: ICC कडून महिला टी-२० वर्ल्डकप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर! या दिवशी भिडणार भारत- पाकिस्तान संघ

Madha Loksabha: मोहिते पाटलांनी स्वतःसाठी खड्डा खणला; लुंग्यासुंग्यांचे आव्हान मानत नाही... रणजितसिंह निंबाळकरांचे टीकास्त्र

Mumabi's Famous Food: 'हे' आहेत मुंबईचे सुप्रसिद्ध खाद्यपदार्थ

SCROLL FOR NEXT