ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सत्ताधारी पक्षाला निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची सरकारी घोषणा किंवा नवीन योजना सुरू करता येत नाही. याशिवाय उद्घाटन, भूमिपूजन असे विविध कार्यक्रमही घेता येत नाहीत.
कुठल्याही सरकारी वाहनाचा वापर निवडणूक प्रचारासाठी करण्यास मनाई.
कोणत्याही पक्षाला प्रचारसभा, रॅली किंवा मिरवणूक काढायची असेल तर पोलिसांची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल.
कोणताही राजकीय पक्ष किंवा उमेदवार धर्म, जात, पंथ या आधारे मतदारांना मत देण्याचं आवाहन करू शकत नाही.
कुणाच्याही घरावर, जमिनीवर किंवा सार्वजनिक परिसरात राजकीय पक्षाचे झेंडे, बॅनर असं काही लावण्यापूर्वी संबंधित व्यक्तीची परवानगी घेणं आवश्यक.
मतदानाच्या दिवशी मद्य विक्री बंद असून प्रचारादरम्यान किंवा मतदानाच्या दिवशी मद्य अथवा पैसे वाटण्यास मनाई.
मतदान केंद्राजवळ कोणत्याही राजकीय पक्षाची किंवा उमेदवाराच्या समर्थकांची गर्दी नसावी.