Ambernath News Saam TV
मुंबई/पुणे

कंपनीतील इंजिनिअरांकडून महिलेचा छळ, विनयभंगाचा गुन्हा दाखल

अंबरनाथमध्ये एका कंपनीत वरिष्ठांनी मानसिक छळ केल्याचा आरोप त्याच कंपनीत नकाम करणाऱ्या महिलेनं केला आहे.

अजय दुधाणे

अंबरनाथ : अंबरनाथच्या (Ambernath) आनंदनगर एमआयडीसीत रेल्वेच्या इंजिनांचे भाग तयार करणारी एक इंजिनिअरिंग कंपनी आहे. या कंपनीत पीडित महिला ही गेल्या ६ वर्षांपासून कंम्प्यूटर ऑपरेटर म्हणून काम करते. या महिलेचा तिच्या ऑफिसमध्ये इंजिनिअर (Engineer) म्हणून काम करणाऱ्या दोघांनी अश्लील शेरेबाजी करणे, शरीराला चुकीचे स्पर्श करणे, बदनामी करणे अशा पद्धतीने छळ केल्याचा आरोप या महिलेने केला आहे.

या त्रासाबाबत महिलेने तिच्या विभागाच्या प्रमुखांना सांगितलं असता त्यांनीही लक्ष दिलं नाही, असा महिलेचा आरोप आहे. या त्रासाला कंटाळून महिलेनं डिसेंबर महिन्यात झोपेच्या गोळ्या घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यावेळी कामाची गरज असल्याने या महिलेनं पोलिसात तक्रार केली नव्हती.

पाहा व्हिडीओ -

मात्र, तेव्हापासून सातत्याने या महिलेला ऑफिसमध्ये काम न देणे, दुसऱ्या विभागात बदली करणे, अपमानास्पद वागणूक देणे अशा पद्धतीने छळ सुरू असल्याचा आरोप या महिलेने केलाय. या सगळ्याबाबत या महिलेनं शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली.

सदर महिलेच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी (Shivajinagar Police) कंपनीचे २ इंजिनिअर आणि एक विभागप्रमुख अशा तिघांविरोधात आयपीसी ३५४ आणि ५०९ अन्वये विनयभंग आणि विनयभंग करण्याच्या उद्देशाने शब्दोच्चार, हावभाव किंवा कृती करणे या कलमान्वये गुन्हा दाखल केला.

२० जुलै २०२२ रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर २७ जुलै रोजी न्यायालयानं या आरोपींना अंतरिम जामीन मंजूर केला, तसंच अटकपूर्व जामीन देण्यासाठी पोलिसांना (Police) म्हणणं मांडण्याचे आदेश दिले. आता ४ ऑगस्टला या आरोपींच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी होणार आहे. यावेळी या आरोपींचा जामीन रद्द करण्याचा अहवाल न्यायालयाला देणार असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भोगे यांनी सांगितलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Hair : ना केस गळती, ना फ्रिझी हेअर; पावसाळ्यातही केस राहतील घनदाट अन् चमकदार, फक्त वापरा 'ही' १ ट्रिक

Maharashtra News Live Update: समृद्धी महामार्गावर धावत्या कारने घेतला पेट

Jalna Bus Accident : जालन्यात भीषण अपघात, दोन एसटी बसेसची समोरासमोर धडक

Blood Pressure by Age: तुमच्या वयोमानानुसार तुमचा BP किती प्रमाणात असला पाहिजे?

पत्नीचा अंगावर काटा आणणारा कट, पतीला मारले अन् मृतदेह बाथरूमखाली गाढला; पोलिसांच्या एका शंकेनं क्रूर कृत्य आले समोर

SCROLL FOR NEXT