Harshvardhan Jadhav Saam TV
मुंबई/पुणे

Harshvardhan Jadhav : भाजपच्या बड्या नेत्यांवर बोचरी टीका; कन्नडच्या माजी आमदारांवर पुण्यात गुन्हा दाखल

एका महिलेने त्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली असता दत्तवाडी पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Harshvardhan Jadhav :कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

प्राप्त माहितीनुसार, दत्तवाडी पोलीस ठाण्यात एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महीला या त्यांच्या राहत्या घरी असताना त्यांच्या मोबाईलवर एक व्हिडिओ आला. या व्हिडिओमध्ये हर्षवर्धन जाधव हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह तसेच खालच्या भाषेत बोलताना दिसले, असा आरोप महिलेने केला आहे.

हर्षवर्धन जाधव यांनी सोशल मीडियावर मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याविषयी अवमानकारक शब्द वापरत त्यांची बदनामी केली. तसेच, गृहमंत्री अमित शहांविषयी अक्षेपार्ह वक्तव्य केले त्यामुळे महिलेने केलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्यावर भारतीय दंडात्मक कलम ३५४ (अ), ५०९, ५०१, ५०५ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पोलिस (Police) अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GAIL Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार सरकारी नोकरी; पगार १.८० लाख; अर्ज कुठे अन् कसा करावा?

Skin Care : चमकदार आणि सुंदर त्वचेसाठी चेहऱ्यावर लावा कडुलिंबाची पेस्ट, करुन बघा घरगुती उपाय

स्टेजवर नवरदेवाची सटकली; नवरीला मारली लाथ अन् सासऱ्याला ही चोपला, नेमकं काय घडलं?

Dipika Kakar : लिव्हर कॅन्सरनंतर दीपिका कक्करची पुन्हा तब्येत बिघडली, VIDEO शेअर करत आजाराबद्दल सांगितले

IND vs SA: या 3 कारणांमुळे भारताचा दारूण पराभव; सुपर-8 च्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताला लोळवलं

SCROLL FOR NEXT