Belhe-Shikrapur Accident Video रोहिदास गाडगे
मुंबई/पुणे

Accident Video: धोकादायक वळणावर कारची दुचाकीला जोरदार धडक; जुन्नरमधील 'या' रस्त्याने आतापर्यंत घेतलेयत ४५ बळी

Junnar Accident Video: रस्त्यावर असलेली अतितीव्र वळणे, चौकात क्रॉसिंगसाठी साइन नसणे, गर्दीच्या ठिकाणी गतिरोधक नसणे यामुळे असे अनेक अपघात येथे घडत आहेत.

रोहिदास गाडगे

Junnar Accident Video: पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात भयंकर अपघात घडला आहे. एका कारने दुचाकीला धडक दिली आहे. कारची दुचाकीला जोरदार धडक (Accident) लागली आणि फुटबॉल उडावा असे दुचाकीवरील सर्वजण उडून रस्त्यावर पडले. नशीब बलवत्तर म्हणून या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. (Pune Latest News)

अपघात म्हटलं तरी अंगावर काटा येतो. असाच अपघात पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात झाला आहे. बेल्हे जुन्नर मार्गावर पारगाव तर्फे आळे जवळ हा अपघात घडला आहे. दुचाकीवर प्रवास करणार जोडपं आणि लहान लेकरू रस्ता क्रॉस करत असताना समोरुन येणाऱ्या कारने त्यांना जोरदार धडक दिली.

या धडकेनंतर दुचाकीवर बसलेला लहानगा अक्षरशः वर उडाला आणि खाली पडला. नशीब बलवत्तर म्हणून हे कुटुंब वाचलं आहे. या अपघाताचा व्हिडिओ (Video) थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला आहे. (Belhe-Shikrapur Accident News)

पाहा अपघाताचा थरारक व्हिडिओ -

बेल्हे-जुन्नर हा महामार्ग जसा वेगवान मार्ग झालाय तेवढाट मृत्यूचा सापळाही बनतोय. बेल्हे ते शिक्रापूर दरम्यान रस्ता सुरू झाल्यापासून या रस्त्यावर आजपर्यंत ४५ बळी गेले आहेत. रस्त्यावर असलेली अतितीव्र वळणे, चौकात क्रॉसिंगसाठी साइन नसणे, गर्दीच्या ठिकाणी गतिरोधक नसणे यामुळे असे अनेक अपघात येथे घडत आहेत.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election 2024: १५८ पक्ष विधानसभेच्या रिंगणात, भाजप तिसऱ्या क्रमांकावर, सर्वाधिक जागा कोण लढवतंय?

Sugarcane Juice: उसाच्या रसाचे आरोग्यदायी फायदे!

Maharashtra News Live Updates: नाशिक जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार

Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

Railtel Recruitment: सरकारी कंपनीत नोकरी करण्याची सुवर्णसंधी;अप्रेंटिस पदासाठी भरती सुरु; पात्रता काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT