Pune News Saam TV
मुंबई/पुणे

Pune News : व्यायाम करण्यासाठी जीममध्ये गेला, फोनवर बोलताना जागीच कोसळला; तरुणासोबत घडली भयानक घटना

Pune Latest News : पुणे शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Pune Latest News : पुणे शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका ओपन जीममध्ये व्यायाम करत असताना एका २२ वर्षीय तरुणाचा वीजेचा धक्का लागून मृत्यू झाला. पुण्यातील भुसारी कॉलनी परिसरात असलेल्या एका जीमममध्ये ही धक्कादायक घटना घडली. या घटनेनं मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

अमोल शंकर नाकते (वय २२, रा. भूगाव) असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमोल हा इव्हेंट मॅनेजमेंटचा काम करायचा. तो रोज संयुक्त भुसारी कॉलनी मित्र मंडळाच्या मैदानात मित्रांसोबत यायचा. सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास तो जीममध्ये आला. दरम्यान, व्यायाम करत असताना, त्याला अचानक फोन आला.

फोनवर बोलत असताना अचानक तो खाली कोसळला. ही गोष्ट लक्षात येताच, अमोलच्या मित्रांनी त्याच्याकडे धाव घेतली. त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात जाण्यापूर्वीच अमोलचा वाटेतच मृत्यू झाला होता. वीजेचा धक्का बसल्याने अमोलच्या पायची बोटे काळीनिळी झाली होती, असं डॉक्टरांनी सांगितलं. या घटनेनं मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजकारणातील ज्येष्ठ नेतृत्व हरपले; माजी महसूल राज्यमंत्री मदन बाफना यांचे निधन

Maharashtra News Live Update: पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद

Tuesday Horoscope : बाप्पाच्या आगमनाने या 6 राशींचे दिवस बदलणार! धनलाभासह प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठी संधी

आता अनेक महीने वाट बघण्याची गरज नाही; 1 ते 3 दिवसांत मिळणार पासपोर्ट; पण ‘ही’ अट महत्त्वाची

Satara Fort : महाबळेश्वरला गेलात? 'या' किल्ल्यावरून दिसतं सह्याद्रीचं मनमोहक सौंदर्य!

SCROLL FOR NEXT