Mumbai Corona Update Saam Tv
मुंबई/पुणे

CORONA UPDATE : मुंबईला कोरोनाचा विळखा, आजची आकडेवारी टेन्शन वाढवणारी

कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत होणारी वाढ नागरिकांसाठी चिंतेची बाब बनली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : येथे कोरोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत (Mumbai corona update) होणारी वाढ नागरिकांसाठी चिंतेची बाब बनली आहे. गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. तीन दिवसांपूर्वी कोरोनाच्या रुग्णसंख्येने (corona new patients) पाचशेचा टप्पा पार केला होता. मात्र, आजच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाल्याने कोरोनाच्या नव्या रुग्णांचा आकडा ९६१ वर पोहोचला आहे. त्यामुळे कोरोनाच्या चौथ्या लाटेला सुरुवात झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

कोरोनाच्या वाढता संसर्गाला अटकाव आणण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने (BMC) सर्व चाचणी केंद्र आणि रुग्णालयांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच सर्व नागरिकांना मास्क वापरण्याचं आणि खबरदारी घेण्याचं आवाहनही केलं आहे.मुंबई महापालिकेच्या रिपोर्टनुसार , मुंबईत दिवसभरात ९६१ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे मुंबईतील आजपर्यंतची बाधीत रुग्णांची संख्या १,०६९,८५८ एवढी झाली आहे.

दरम्यान, आज मुंबईत एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोना मृतांची संख्या १९५६९ वर पोहोचली आहे. तर मुंबईत एकूण ४८८० एवढे सक्रिय रुग्ण आहेत. तसेच आज कोरोनाच्या ४४ नव्या रुग्णांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर ३७४ रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोनातून बरे झालेल्या मुंबईतील एकूण रुग्णांची संख्या १,०४५,४०९ वर पोहोचली आहे. मुंबईत कोरोनाने बरे झालेल्या रुग्णांचा दर ९८ टक्के आहे, तर रुग्ण दुपटीचा दर १२०४ दिवसांवर गेला आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kito Diet: कीटो डाइट सुरू केल्यावर शरीरात काय होतं? फॅट बर्निंगपासून ब्लड शुगरपर्यंत जाणून घ्या ‘हे’ बदल

Maharashtra News Live Update: संजय राऊत म्हणजे बिनडोक - गोपीचंद पडळकर

LNG Train : गुजरातमधून धावली देशातील पहिली LNG ट्रेन; वैशिष्ट्ये पाहून तुमचेही डोळे विस्फारतील

Skin Care: ग्लोईंग त्वचा हवी असेल तर सकाळी करा हे 3 स्किनकेअर उपाय; चेहऱ्यावर दिसेल नॅचरल शाईन

काँग्रेसला मोठा धक्का! बड्या नेत्यासह अनेकांनी पक्षाला ठोकला रामराम; सरकारवर गंभीर आरोप करत BRSमध्ये केला प्रवेश

SCROLL FOR NEXT