सिद्धेश म्हात्रे
पनवेल : पनवेलमधून (Panvel) धक्कादायक बातमी समोर येत आहे. पनवेलमधील हॉस्टेलमध्ये ११ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने पनवेलमध्ये खळबळ उडाली आहे. पनवेलच्या वीट व्होकेशनल ट्रेनिंग सेंटरच्या हॉस्टेलमध्ये हा विषबाधेचा (poison) प्रकार घडला आहे. सध्या विद्यार्थ्यांवर (Students) पनवेल जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आता सर्व ११ विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. ( Panvel Latest News In Marathi )
हे देखील पाहा -
पनवेलमधील वीट व्होकेशनल ट्रेंनिग सेंटरच्या हॉस्टेलमध्ये काल पाण्याचा टँकर मागविण्यात आला होता. हा पाण्याचा टँकर हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांना पिण्यासाठी मागविला होता. त्यामुळे नेहमी सारखं हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांनी या हॉस्टेलमधील पाणी प्यायले. मात्र, हे पाणी काल मागविण्यात आलेल्या पाण्याचा टँकरमधील होते. हॉस्टेलमधील पाणी प्यायल्याने ११ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. त्यामुळे त्यांना रात्री उशिरा त्यांना जुलाब आणि उलट्याचा त्रास सुरू झाला. त्यानंतर या ११ विद्यार्थ्यांना पनवेल जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने पनवेलमध्ये खळबळ उडाली आहे.
दरम्यान, हॉस्टेलमधील ११ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यानंतर त्यांना पनवेल जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यांवर उपचार सुरू आहेत. सध्यस्थितीत सर्व विद्यार्थिनींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे.
पनवलेमध्ये प्रसादासाठी आणलेल्या हलव्यातून २० जणांना झाली होती विषबाधा
दरम्यान,गेल्या वर्षीही पनवेलमध्ये दत्तजयंतीच्या कार्यक्रमात प्रसादासाठी आणणेला दुधी हलवा खाल्याने २० जणांना विषबाधा झाली होती. ही घटना वेल तालुक्यातील रिटघर गावात घडली होती. पीडितांपैकी १० महिन्यांचे बाळ वगळता सर्वांनी घरी राहूनच डॉक्टरांकडून उपचार घेतले होते.या प्रकरणी पनवेल तालुका पोलिस ठाण्यात खोपोलीतील मिठाई दुकानमालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Edited By - Vishal Gangurde
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.