मुंबई - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित मालमत्तेतील मनी लाँड्रिंग प्रकरणात, ईडीने (ED) छोटा शकीलच्या जवळ असलेल्या सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रूटला दीर्घ चौकशीनंतर सोडले. मंगळवारी सकाळी ईडीने सलीमला डोंगरी भागातून ताब्यात घेतले होते. 9 तास चौकशीनंतर सलीम फ्रूट याला सोडून देण्यात आले असून आज पुन्हा चौकशीला बोलवले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
हे देखील पहा -
ईडीने मंगळवारी मुंबई आणि ठाण्यात अनेक ठिकाणी छापे टाकले, त्यापैकी एक मुंबईतील नागपाडा भागात दाऊदची बहीण हसिना पारकर हिचे घर आणि तिच्या काही साथीदारांच्या लपून बसलेल्या ठिकाणांवर ईडीने छापे टाकले. ईडीच्या अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार काल मुंबईत 9 ठिकाणी छापे टाकण्यात आले. तर ठाण्यातील एका ठिकाणी छापा टाकण्यात आला. ईडीचे एक पथक दाऊदचा भाऊ इक्बाल कासकर याच्या भेंडी बाजार येथील घरी पोहोचले होते. मात्र तेथे कोणीही मिळून आले नाही.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.