नवी मुंबईतील न्हावा शेवा बंदरावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) 'ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट’द्वारे पाकिस्तानातून आलेला माल जप्त केला आहे. १,११५ मेट्रिक टन वजनाचा, सुमारे ९ कोटी रुपये किमतीचा माल पाकिस्तानातून छुप्या पद्धतीने दुबई मार्गे आणला गेला.
पहलगामध्ये २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी भ्याड हल्ल्यानंतर भारतात केंद्र सरकारने पाकिस्तानातून थेट किंवा अप्रत्यक्ष मार्गाने येणाऱ्या मालाच्या आयातीवर पूर्ण बंदी घातली होती. या पार्श्वभूमीवर महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) मोठी कारवाई करत ‘ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट’ अंतर्गत १,११५ मेट्रिक टन वजनाचा, सुमारे ९ कोटी रुपये किमतीचा पाकिस्तानमधून आलेला माल जप्त केला आहे. हे ३९ कंटेनर्स न्हावा शेवा बंदरावर पकडले गेले असून, एका आयातदार कंपनीच्या भागीदारास काल (दि २६) रोजी अटक करण्यात आली आहे. हे पाकिस्तानी कंटेनर दुबई मार्गे भारतात आल्याची सविस्तर माहिती अर्थ मंत्रालयाने दिली आहे.
काल (दि २६) एका अधिकृत निवेदनात अर्थ मंत्रालयाने या जप्तीची माहिती दिली आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार,पाकिस्तानमधून वस्तूंच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयात आणि वाहतुकीवर बंदी घालतलेली असतानाही. या घटनेने भारताच्या आयात नियमांचे उल्लंघन केले आहे. या प्रकरणात आयात करणाऱ्या कंपनीच्या एका भागीदाराला अटक करण्यात आली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने २ मे २०२५ पासून पाकिस्तानी आयातीवर पूर्ण बंदी घातली होती. यापूर्वी, पाकिस्तानातून येणाऱ्या वस्तूंवर २०० टक्के सीमाशुल्क आकारले जात होते. या कडक उपाययोजना असूनही, काही आयातदारांनी इतर देशांमधून येणाऱ्या वस्तू खोट्या पद्धतीने घोषित करून अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे.
"दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये, न्हावा शेवा बंदरावर हे सामान जप्त करण्यात आले. हे सामान खोटे सांगून युएईचे मूळ असल्याचे घोषित करण्यात आले होते, ज्यामध्ये त्यांचे मूळ पाकिस्तानी असल्याचे लपवण्यात आले होते," असे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.