how many Indian students stuck due to flight  Saam TV Marathi
मुंबई/पुणे

मोठी बातमी! पुण्यातील ८० विद्यार्थी आणि ४ शिक्षक युद्धात अडकले, दुबईतून मोठी अपडेट आली समोर

how many Indian students stuck due to flight cancellations : इराण-इस्रायल युद्धामुळे दुबईत अडकलेल्या पुण्यातील इंदिरा कॉलेजच्या ८० विद्यार्थ्यांसह ४ शिक्षक सुरक्षित असून त्यांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

Namdeo Kumbhar

Indira College Pune students stranded in Dubai update : अमेरिका आणि इस्रायलचे इराणसोबत युद्ध सुरू झाल्यामुळे याचा मोठा फटका भारतीयांनाही बसला आहे. इराणने दुबईवर क्षेपणास्त्र हल्ला केल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. हवाई क्षेत्र बंद असल्याने विमानाचे उड्डाण बंद करण्यात आले आहेत. याचा परिणाम पुण्यातील पिंपरी-चिंचवडमधील इंदिरा कॉलेजचे ८४ भारतीय दुबईत अडकून पडले आहेत.

पुण्यातील नामांकित इंदिरा कॉलेजचे ८४ जण दुबई मध्ये अडकले आहेत. त्यामध्ये ८० विद्यार्थी आणि ४ शिक्षकांचा समावेश आहे. हे सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती सरकारकडून देण्यात आलेली आहे. दुबईत अडकलेले हे सर्व विद्यार्थी सुखरूप असून आम्ही त्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या सतत संपर्कात आहोत. विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यासाठी दुबईतील भारतीय दूतावास आणि आपल्या देशाच्या परराष्ट्र मंत्रालयाशी आमचे बोलणे सुरू आहे, अशी माहिती इंदिरा कॉलेजचे डीन जनार्दन पवार यांनी दिली आहे."

पुण्यातील नामांकित इंदिरा कॉलेजचे विद्यार्थी "स्टडी व्हिसिट" साठी दुबई येथे गेले होते. पण त्याचवेळी युद्धजन्य परिस्थिती सुरू झाली. परराष्ट्र मंत्रालयाकडून पुण्यातील विद्यार्थ्यांना लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

कृपया कोणी ही घाबरून जाऊ नये, विद्यार्थ्यांना लवकरात लवकर मायदेशात आणले जाणार, महाविद्यालयाकडून आवाहन करण्यात आल आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडून सुद्धा विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

दुबईला जाणारी चार विमाने रद्द -

इराण-इस्त्राइल अमेरिका युद्धामुळे पुण्यातून दुबईला जाणारी चार विमाने रद्द करण्यात आली आहेत. पुण्यातून स्पाइस जेट कंपनीचे मुंबई ते दुबई तसेच एअर इंडिया एक्सप्रेसचे पुणे ते दुबई विमान रद्द करण्यात आले आहे. विमानतळावर प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. विमानतळावर येण्याआधी प्रवाशांनी संबंधित एअरलाइनशी संपर्क साधून फ्लाईट स्टेटस तपासण्याची विमानतळ प्रशासनाकडून विनंती करण्यात आले. युद्धजन्य परिस्थिती संपल्यानंतर पुढील तारखेचे पर्यायी उड्डाण प्रवाशांना दिले जातील असे सांगण्यात आलेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज्यात ४२ हजार हेक्टरवरील पिकांना ‘अवकाळी’चा फटका'

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आठव्या वेतन आयोगात बदलणार ही योजना

Shocking : "...तो तुझा मामा आहे" शेजारच्या तरुणासोबत आईला नको त्या अवस्थेत पाहिलं; मुलीला मांडीवर बसवलं अन्...

Bigg Boss Marathi 6 : 'बिग बॉस मराठी ६'मध्ये होणार वाइल्ड कार्ड एन्ट्री, 'या' ग्लॅमरस अभिनेत्रीच्या नावाची चर्चा

Public Holiday: ३ की ४ मार्च, होळीनिमित्त बँकांना सुट्टी कधी? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT