Dombivli news Saam Tv
मुंबई/पुणे

Shocking: क्रिकेट खेळताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून ७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Dombivli news: डोंबिवलीमध्ये क्रिकेट खेळताना विजेचा धक्का लागून ७ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना डोंबिवली पूर्वेकडील गोग्रासवाडी परिसरात घडली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Priya More

Summary Points

  • डोंबिवलीमध्ये हृदयद्रावक घटना घडली

  • क्रिकेट खेळताना ७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

  • विजेचा धक्का लागून चिमुकल्याचा मृत्यू

  • विजेचा धक्का लागून चिमुकला फिडर पिलरला चिकटला

संघर्ष गांगुर्डे, डोंबिवली

इलेक्ट्रिक फिडरच्या पिलरला स्पर्श झाल्याने ७ वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना डोंबीवलीमध्ये घडली. डोंबिवली पूर्वेकडील गोग्रासवाडी परिसरात असलेल्या जिजाईनगरमध्ये हृदयद्रावक घटना घडली. याच परिसरात रस्त्याच्या कडेला असलेल्या महावितरणच्या फिडर पिलरला स्पर्श झाल्याने विजेचा तीव्र धक्का लागून या मुलाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. टिळकनगर पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

कृष्णा संजय यादव असं या घटनेत मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. या संदर्भात कृष्णाचे वडील संजय मेवालाल यादव यांनी दिलेल्या जबानीवरून टिळकनगर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. जिजाईनगरातील विठ्ठल कृपा बिल्डिंगमध्ये यादव कुटुंबीय गेल्या ८ वर्षांपासून राहत आहेत. संजय यादव हे डोंबिवली परिसरात टेम्पो चालवून त्यावर मिळणाऱ्या उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात.

संजय आणि त्यांची पत्नी निशा यांना अर्जुन आणि कृष्णा अशी दोन मुलं आहेत. पण पोटच्या कृष्णाच्या मृत्यूमुळे यादव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. संजय यांचा लहान मुलगा कृष्णा हा शाळेला सुट्टी असल्याने विठ्ठल कृपा बिल्डींगच्या मागच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत बॉल खेळत होता. त्याचा बॉल यमुना अर्जुन सोसायटीसमोर कॉर्नरला असलेल्या लाईटचा फिडर पिलरजवळ गेला. बॉल काढत असताना स्पर्श झाल्याने कृष्णा फिडरच्या पिलरला चिकटून बेशुद्ध पडला.

स्थानिक नागरिकांनी तत्काळ कृष्णाला उचलून स्टार कॉलनीतील एसीई हॉस्पिटलमध्ये नेले. मात्र तेथील डॉ. मुकेश केणे यांनी तपासून त्याला ८.४५ वाजता मृत घोषित केले. केडीएमसीच्या शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये उत्तरीय तपासणीनंतर कृष्णाचा मृतदेह त्याच्या पालकांकडे देण्यात आला. आपला मुलगा कृष्णा याच्या मृत्यूबाबत माझा कुणावर संशय नाही, असं संजय यादव यांनी त्यांच्या जबाबात म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cholesterol Symptoms: शरीराच्या या 3 भागांमध्ये सर्वात आधी दिसतात हाय कोलेस्ट्रॉलची लक्षणं

Maharashtra News Live Update: TET पेपरफुटी प्रकरणी आणखी तिघांना अटक, आरोपींची संख्या 10 वर

संतापजनक कृत्य! सहकाऱ्याच्या गुदद्वारात कॉम्प्रेसरचा पाइप घातला,पोटात हवा गेल्यानं कामगाराचा मृत्यू

Running Benefits: वजन कमी करायचं आहे? मग दररोज ३० मिनिटं धावण्याची सवय लावा, शरीराला होतील हे ७ फायदे

Rain Health Tips: पावसात भिजल्यानंतर कोणते आजार होऊ शकतात?

SCROLL FOR NEXT