अवघ्या १ तासात शोधले ७ तोळे दागिने; मानपाडा पोलिसांची क्विक कामगिरी... प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

अवघ्या १ तासात शोधले ७ तोळे दागिने; मानपाडा पोलिसांची क्विक कामगिरी...

घरी गेल्यानंतर त्यांना 7 तोळे दागिने (Jewellery) रिक्षातच राहिल्याचे लक्षात आले. मात्र तोपर्यंत रिक्षा चालक निघून गेला होता.

प्रदीप भणगे

डोंबिवली: डोंबिवली पूर्वेत दावडी परिसरात राहणाऱ्या शोभा गायकवाड यांच्या मुलीच्या मैत्रिणीचे काल दादर (Dadar) येथे लग्न होते. या लग्नासाठी सर्व कुटुंबीय दादरला गेले होते. लग्न समारंभ आटोपून रात्री नऊच्या सुमारास गायकवाड कुटुंबीय डोंबिवली रेल्वे स्थानकावर (Dombivali Railway Station) आले आणि तेथून दावडी येथे घरी जाण्यासाठी रिक्षा (Auto Rickshaw) पकडली. त्यांना दावडी येथे सोडून रिक्षा चालक तेथून निघून गेला, घरी गेल्यानंतर त्यांना 7 तोळे दागिने (jewellery) रिक्षातच राहिल्याचे लक्षात आले. मात्र तोपर्यंत रिक्षा चालक निघून गेला होता. (7 weights of jewelry discovered in just 1 hour; Quick performance of Manpada police)

हे देखील पहा -

गायकवाड यांच्याकडे रिक्षाचा नंबर नव्हता त्यांनी तत्काळ मानपाडा पोलीस ठाण्यात (Manpada Police Station) याबाबत माहिती दिली. मानपाडा पोलिसांनी रिक्षा कशी होती याचे वर्णन गायकवाड यांच्याकडून जाणून घेतले आणि मानपाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वनवे यांच्या पथकाने त्वरित तपास सुरू केला. स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) पोलिसांनी तपासले. या सीसीटीव्हीत ती रिक्षा (Auto Rickshaw) आढळून आली. रिक्षाच्या व्ह्यूडवर पांढऱ्या रंगाची पट्टी होती, रिक्षाचा नंबर व त्या पट्टीच्या आधारे पोलिसांनी रिक्षा चालकाचा शोध घेतला.

आधी रिक्षा चालकाने (Rickshaw Driver) मला याबाबत काही माहीत नसल्याचे सांगितले, मात्र पोलिसी खाक्या आवळताच त्याने दागिने परत केले आणि आज पोलिसांनी शोभा गायकवाड यांना त्यांचे दागिने परत केले आहेत. त्यामुळे अवघ्या तासाभरात पोलिसांनी दागिने शोधून परत केल्याने महिलेने मानपाडा पोलिसांचे (Manpada Police) आभार मानले आहेत, तर पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT