Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Ulhasnagar Crime News: जुन्या भांडणाच्या रागातून हत्येचा प्रयत्न; उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरातील घटना

Crime News Today: ही धक्कादायक घटना उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात घडली आहे.

अजय दुधाणे

Ulhasnagar News: उल्हासनगरमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनैतिक संबंध, कौटुंबिक कलह, महिलांवरील अत्याचार, आर्थिक फसवणूक यातून हत्या आणि आत्महत्येच्या घटना सातत्याने समोर येत आहेत.  (Latest Marathi News)

त्यातच आता किरकोळ वादातून तरुणाच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. ही घटना उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी 4 आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

उल्हासनगर (Ulhasnagar) कॅम्प चार मधील मराठा सेक्शन परिसरात राहणारा मृगण हा इडली विक्री व्यवसायाच काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. रात्रीच्या सुमारास मृगण हा रेल्वे स्टेशन परिसरात त्याच्या हॉटेलमध्ये काम करताना मृगण याला भूक लागल्याने तो बाहेर आला. (Crime News)

मात्र यावेळी मृगण याला काहीच न समजतात सात ते आठ जणांचे टोळीने तलवार रोडच्या साह्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात मृगण हा गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस (Police) ठाण्यात हत्येचा प्रयत्नाच्या गुन्ह्यात आरोपी अजय, कुबड्या, गण्या आणि चेतन यांना अटक करण्यात आली आहे. तर उर्वरित आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Morning blood pressure: सकाळी उठल्या उठल्या बीपी वाढलेला असतो? 'ही' आहेत त्यामागची धोकादायक कारणं

Bank Holiday: खातेधारकांनो लक्ष द्या! 13 ऑगस्टला बँका बंद की सुरू? जाणून घ्या तुमच्या राज्यातील अपडेट...

India Fort : १५ ऑगस्टला फिरण्याचा प्लान करताय? देशभक्तीची भावना जागवणाऱ्या 'या' ऐतिहासिक स्थळांना नक्की भेट द्या

Maharashtra News Live Update : आंबोली-चौकुळच्या सड्यावर कोल्ह्यांच्या कळपाचा मुक्त खेळ

Fitness Tips: जिमला जाण्याची गरज नाही! फिट आणि अॅक्टिव्ह राहण्यासाठी ‘या’ ७ सवयी लावा

SCROLL FOR NEXT