Mumbai Crime
Mumbai Crime Saam Tv
मुंबई/पुणे

परदेशी नागरिकाकडे सापडले सात कोटींचे अंमली पदार्थ; आरोपीला अटक

सुरज सावंत

मुंबई - परदेशी नागरिकाकडे विमानतळावर सात कोटी रुपयांचे अंमली पदार्थ आढल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे. डीआरआयची कारवाईमध्ये हे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.

अंमली पदार्थ तस्कर असल्याच्या संशयावरून महसुल गुप्तवार्ता संचलनालयाने (डीआरआय) ताब्यात घेतलेल्या ३८ वर्षीय परदेशी नागरिकाच्या पोटातून ७० कॅप्सूल बाहेर काढण्यात आल्या आहेत. या कोकेनची किंमत सात कोटी रुपये आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून ब्रँडन सुल्पिसिअस मिगाडे असे या परदेशी नागरीकाचे नाव आहे.

हे देखील पाहा -

मूळचा युगांडा देशाचा नागरिक असलेला मिगाडे याला १३ मे रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले होते. तो इथोपियावरून मुंबईत आला होता. त्याच्या पोटात कोकेन असल्याचा संशय अधिकाऱ्यांना होता.

त्यामुळे त्याची वैद्यकीय चाचणी करण्यासाठी न्यायालयाकडे परवानगी मागण्यात आली होती. त्यानुसार जे.जे. रुग्णालयात त्याचा एक्सरे व सोनोग्राफी करण्यात आली. त्यावेळी त्याच्या पोटात संशयीत कॅप्सूल असल्याचे निष्पन्न झाले होते.

डॉक्टरांनी त्याच्या पोटातून या ७० कॅप्सूल काढल्या. त्यात कोकेन असल्याचे निष्पन्न झाले. जप्त करण्यात आलेल्या कोकेनचे वजन ६९० ग्रॅम असून त्याची किंमत सुमारे सात कोटी रुपये आहे. घरची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्यामुळे त्याने हे काम करण्यास होकार दिला होता. त्याला सोमवारी याप्रकरणी डीआरआयने अटक केली. आरोपीच्या इतर साथीदारांबाबत डीआरआय अधिक तपास करत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : तब्येतीमुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR: सुनिल नारायणच्या फटकेबाजीने LSG च्या गोलंदाजांना दाखवलं 'आस्मान'; लखनऊसमोर २३६ धावांचे आव्हान

Sharad Pawar News: शरद पवारांची प्रकृती अस्वस्थ, उद्याचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द

IPL 2024 : जडेजाच्या ऑलराउंडर खेळीने पंजाबचं प्लेऑफचं स्वप्न भंगलं; Points Table मध्ये CSKची टॉप-३ मध्ये एंट्री

Prajwal Revanna: प्रज्वल रेवन्नाविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी, जाणून घ्या काय आहे या नोटीसचा अर्थ

SCROLL FOR NEXT