पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर 6 वाहने एकमेकांवर धडकुन अपघात ...(पहा व्हिडीओ) दिलीप कांबळे, विकास मिरगणे
मुंबई/पुणे

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर 6 वाहने एकमेकांवर धडकुन अपघात ...(पहा व्हिडीओ)

सहा गाड्यांचा विचित्र अपघात

विकास मिरगणे, दिलीप कांबळे

दिलीप कांबळे, विकास मिरगणे

पुणे: मुंबई पुणे एक्सप्रेस Mumbai Pune Express वेवर 6 वाहनांचा भीषण अपघात Accident झाला आहे. अपघाताची घटना यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वेवर पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली आहे. खंडाळा Khandala घाटातील परिसरात या वाहनांचा विचित्र भीषण अपघात झाला आहे. तर याअपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

यंत्रणांच्या अथक प्रयत्नानंतर सदरच्या वाहनांमध्ये अडकलेले मृतदेह आणि जखमी लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. तर अपघातग्रस्त वाहने बाजूला करून विस्कळीत झालेली वाहतूक सातच्या सुमारास पूर्ववत करण्याचे काम सुरु होते.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात जाणार्‍या एका टेम्पोच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. यामुळे टेम्पो समोरील भाजीच्या टेम्पोवर जाऊन जोरात आदळला. तो टेम्पो समोरील कारवर जाऊन आदळला आणि कोंबडी वाहक टेम्पोने एका प्रवासी बसला धडक दिली. तर एक कार टेम्पो आणि ट्रेलरच्या मध्ये चिरडली गेली आहे. अशा प्रकारे हा विचित्र अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

यामध्ये एका हुंदयाई कारमधील चालक आणि अन्य एक जण असे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर कोंबडी वाहक टेम्पोचा चालक असे एकूण 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 6 जणांना वाचवण्यात यश आले आहे ते गंभीर जखमी आहेत.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amitabh Bachchan : बिग बींनी स्टाफला दिलेलं दिवाळी गिफ्ट पाहून नेटकरी संतापले, म्हणाले- 'लज्जास्पद...', VIDEO व्हायरल

Hand Sanitizer Cancer Risk: वारंवार सॅनिटायझर वापरल्याने कॅन्सरचा धोका वाढतो का? जाणून घ्या तज्ज्ञांचं मत

Crime News : चक्रीने घात केला! ऑनलाईन गेमिंगच्या आहारी जाऊन तरुणाची आत्महत्या, काय आहे प्रकार?

Eknath Khadse: मोठी बातमी! एकनाथ खडसे यांच्या घरी जबरी चोरी, कपाटं फोडून चोरट्यांकडून मुद्देमाल लंपास

Maharashtra Live News Update: रवींद्र धंगेकर घेणार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

SCROLL FOR NEXT