Malshej Ghat ST Bus Accident Saam Tv
मुंबई/पुणे

Malshej Ghat ST Bus Accident: माळशेज घाटात एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 6 प्रवासी गंभीर जखमी

Accident News: अपघातामध्ये ट्रक आणि एसटी बसचे मोठे नुकसान झाले आहे.

रोहिदास गाडगे

रोहिदास गाडगे

Malshej Ghat On Kalyan- Nagar Road : माळशेज घाटामध्ये (malshej ghat) एसटी बस आणि ट्रकला भीषण अपघात (St Bus And Truck Accident) झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातामध्ये सहा प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे माळशेज घाटातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. हा अपघात इतका भीषण होता की अपघातामध्ये ट्रक आणि एसटी बसचे मोठे नुकसान झाले आहे. महामार्ग पोलिसांकडून अपघाताचा तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याणवरुन आळेफाट्याच्या दिशेने एसटी बस जात होती. या एसटी बसने माळशेज घाटामध्ये ट्रकला जोरदार धडक दिली. अपघातामध्ये एसटीमधील सहा प्रवासी गंभीर जखमी झाले तर 15 जण किरकोळ जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिक, घाटातून जाणारे प्रवासी आणि महामार्ग पोलिसांनी जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघातातील जखमी प्रवाशांवर आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघाताचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

अपघातानंतर एसटी बस झाडं आणि रस्त्याच्या कठड्यामध्ये अडकल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या अपघातामध्ये ट्रक आणि एसटी बसचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाळ्यापूर्वी माळशेज घाटामध्ये ठिकठिकाणी दुरुस्तीचे काम सुरु आहे. या कामामुळे अनेक ठिकाणी एकेरी वाहतूक सुरु आहे. अशामध्ये घाटातील नागमोडी वळणं आणि उतार यामुळे वाहनांची वेग मर्यादा राहत नसल्यामुळे वारंवार अपघात वारंवार होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News : मोबाईल विहिरीत पडला; अकोल्यातील पठ्ठ्याने अख्खी यंत्रणा कामाला लावली, नेमकं काय घडलं? VIDEO

India vs Pakistan : भारत-पाकिस्तानची मॅच दाखवाल तर टीव्ही फोडणार; ठाकरे गटाचा हॉटेल मालकांना इशारा

Jeans: जीन्स खरेदी करताना लक्षात ठेवा 'या' ५ गोष्टी

Asia Cup: चक्क दे इंडिया! भारतीय महिला हॉकी संघाचा अंतिम फेरीत प्रवेश

Fatty Liver: फॅटी लिव्हर रोखण्यासाठी दररोजच्या जीवनात करा 'या' सोप्या गोष्टी

SCROLL FOR NEXT