Pune Crime News: संतापजनक! २० वर्षीय तरुणीवर वस्तीगृहातील कर्मचाऱ्याकडून अत्याचार; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी...

Pune News update: याप्रकरणी पिडीत तरुणीने तक्रार दाखल केली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
Pune Hadapsar Police
Pune Hadapsar Police SAAM TV

अक्षय बडवे, प्रतिनिधी...

Pune Crime News: विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या एका मुलीवर वस्तीगृहातील कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. लॉरेन्स फ्रॉन्सिस अँथेनी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात पिडीत तक्रार दाखल केली आहे... (Pune News)

Pune Hadapsar Police
Pradeep Kurulkar News: डीआरडीओचे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांना १२ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी

याबाबत अधिक माहिती अशी की, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वस्तीगृहामध्येच वीस वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याचा संतापजनक (Pune Crime) प्रकार समोर आला आहे. तक्रारदार तरुणी ही शहरातील एका शाळेत शिक्षण घेत असताना वस्तीगृहात वास्तव्यास होती.

त्यावेळी लॉरेन्स हा त्या ठिकाणी काम करत होता. त्याने संबंधित तरुणीला, पिंपरी चिंचवड येथे नवीन वस्तीगृह चालू करणार आहे असं सांगितले. तसेच त्याठिकाणी इथल्या वस्तीगृहापेक्षा चांगली सुविधा आम्ही देणार असे सांगून त्याने मुलीस घरी घेऊन गेला. (Latest Marathi News)

Pune Hadapsar Police
Urmodi Dam News: दुर्देवी! उरमोडी धरणात दोन युवक बुडाले; पाण्याचा अंदाज न आल्याने घडला अनर्थ

त्यानंतर मुलीकडून घरातील कामे करुन घेत पत्नी व मुले घरी नसताना, तिच्याशी जबरदस्तीने शारिरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करुन तो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने अनेकदा अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी हडपसर (Hadapsar Police) पोलीस ठाण्यात पिडीत तरुणीने तक्रार दाखल केली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com