Mumbai Crime News Saam Tv
मुंबई/पुणे

Shocking : मुंबई पुन्हा हादरली! सराफाची दुकानात घुसून निर्घृण हत्या

Mumbai Crime News : मुंबईतील भाईंदरमध्ये सराफ सुशांतो अबोनी पॉल यांची दुकानात हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डोक्यावर गंभीर जखमा आढळल्याने हत्येचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Alisha Khedekar

  • भाईंदर पूर्वेतील सोन्याच्या दुकानात सराफाची हत्या करण्यात आली

  • दुकानाची काच फोडून आत प्रवेश केल्यावर गंभीर जखमा दिसल्याने हत्या झाल्याचे समोर आले

  • कौटुंबिक वाद असून सराफ काही दिवसांपासून दुकानात राहत होते

  • नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून हत्येचा तपास सुरू करण्यात आला आहे

  • घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे

मनोज तांबे, विरार

मुंबईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील भाईंदर भागात एका सराफाची हत्या करण्यात आली. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशांतो अबोनी पॉल (५२) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलीस याप्रकरणाचा तपास करत असून या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाईंदर पूर्व येथील एस.व्ही. रोड परिसरात पॉल यांचा सोन्याच दुकान आहे. पॉल यांचा काही काळापासून कौटुंबिक वाद सुरू असल्याने ते मागील काही दिवसांपासून दुकानातच राहत होते.दरम्यान, बुधवारी सकाळी त्यांनी दुकान उघडलं नसल्याने कामगारांनी आणि कुटुंबीयांनी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने शंका निर्माण झाली.

त्यानंतर काही नागरिकांनी परिणामी कारखान्याची काच फोडून आत प्रवेश केला. यादरम्यान पॉल हे मृत अवस्थेत आढळले. त्यांच्या डोक्यावर जखमा असल्याचे निदर्शनास आले.याबाबत क्षणाचाही विलंब न करता पोलिसांना तत्काळ माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास सुरु केला आहे. यासंदर्भात गुन्हा दाखल करून तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिली.

पोलिसांच्या प्राथमिक तपासात हत्या झाल्याचे निदर्शनास आले असून, यासंदर्भात गुन्हा दाखल करून तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिली. दरम्यान ही हत्या का झाली? हत्येमागचं नेमकं कारण काय? तसेच हत्येमागे नेमका कोणाचा हात आहे हे अद्यापही अस्पष्ट आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nepal Protest : नेपाळमध्ये पुन्हा हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, विमानतळ बंद

Dry Skin Care: ड्राय स्किनला करा बाय बाय, अंघोळीनंतर करा 'हा' घरगुती सोपा उपाय, आठवड्याभरात दिसेल फरक

मंदिरात भेटायला बोलावलं, अपरहण करत हॉटेलवर नेलं; तरुणीवर गँगरेप करत....

Maharashtra Live News Update: कुत्रा मागे लागल्याने तिसऱ्या मजल्यावर खाली कोसळला अन् जीव गमावला

Taj Mahal: सिमेंट नसतानाही कसा बांधला गेला इतका मजबूत ताजमहाल?

SCROLL FOR NEXT