कर्नाळा बँकेतील ५०० कोटींच्या घोटाळ्यात ईडीची मोठी कारवाई
माजी आमदार विवेक पाटील यांच्या जमिनी व स्पोर्ट्स अकॅडमीचा लिलाव होणार
ठेवीदार, विमा कंपन्या व कर्मचाऱ्यांचे देणे फेडण्यासाठी लिलाव
न्यायालयाने पीएमएलए कायद्यानुसार मालमत्ता विक्रीला मान्यता दिली
विकास मिरगणे, नवी मुंबई प्रतिनिधी
₹500 Crore Karnala Bank Scam: नवी मुंबईमधून कर्नाळा बँक घोटाळ्याबाबत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. कर्नाळा बँकेतील ठेवीदार आणि गॅरेंटर यांचे पैसे परत करण्यासाठी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार विवेक पाटील यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याचे आदेश ईडीच्या विशेष न्यायालयाने दिले आहेत. पनवेलची प्रसिध्द कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी आणि पोसरी येथील १०२ एकर जमिनीच्या लिलाव करण्यात येणार आहे. त्यामधून जमा होणाऱ्या रक्कमेतून गैरव्यवहारातील रक्कम वसूल केली जाणार आहे.
५०० कोटींच्या घोटळ्याप्रकरणी विवेक पाटील मागील चार वर्षांपासून तळोजा कारागृहात आहेत. इडीच्या पीएमएलए न्यायालयात विवेक पाटील यांनी आपल्या ८७ मालमत्तांचे लिलाव करून त्याच्यातून पैसे उभे करण्याबाबत न्यायालयात कळवले आहे. पहिल्या टप्प्यात कर्नाळा स्पोर्ट्स अकादमी आणि पोसरी येथील १०२ एकर जमीनीचा या करिता लिलाव केला जाणार आहे. यापैकी पोसरी येथील जमिनीच्या लिलावाची प्रक्रिया सर्वात आधी केली जाणार आहे.
विमा कंपनीचे ३८० कोटी, उर्वरित ठेवीदारांचे १७८ कोटी आणि बँकेचा ताळेबंद कर्मचाऱ्याची थकबाकी, इनकम टॅक्सच्या रक्कमा आदी देणे संपविण्यासाठी पीएमएए कायद्यानुसार पनवेलची कर्नाळा स्पोर्टस अकॅडमी आणि खालापूर तालुक्यातील पोसरी येथील 103 एकर जमिन लिलावात काढली जाणार आहे. यातून सर्वांचे पैसे माघारी दिले जाणार आहेत.
बँक घोटाळ्यांमध्ये कोणत्या प्रकारच्या अनियमितता सामान्यतः आढळतात?
बँक घोटाळ्यांमध्ये कर्ज मंजुरीतील गैरप्रकार, बनावट कागदपत्रे, अधिकारांचा गैरवापर आणि गुंतवणूकदारांच्या पैशांचा अपहार यासारख्या अनियमितता आढळतात.
कर्नाळा बँक घोटाळा काय आहे?
हा ५०० कोटींचा आर्थिक घोटाळा असून ठेवीदारांच्या आणि कंपन्यांच्या पैशाचा गैरवापर झाला. यामध्ये माजी आमदार विवेक पाटील यांना आरोपी करण्यात आलं आहे.
लिलाव कोणत्या मालमत्तांचा होणार आहे?
पनवेल येथील कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी आणि खालापूर तालुक्यातील पोसरी येथील १०२ एकर जमीन लिलावात काढण्यात येणार आहे.
विवेक पाटील सध्या कोठे आहेत?
५०० कोटी घोटाळ्याच्या आरोपांनंतर ते गेली ४ वर्ष तळोजा कारागृहात आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.