5 school girls were molested by school peon case register In Bandra police Mumbai  Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Crime News: मुंबईत ५ शाळकरी मुलींसोबत शिपायाचं संताजनक कृत्य; पोलिसांत गुन्हा दाखल

Mumbai Crime News: शाळेत काम करणाऱ्या एका नराधम शिपायाने ५ शाळकरी मुलींचा विनयभंग केला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Satish Daud

Mumbai Crime News

मागील काही दिवसांपासून मुंबई शहरात महिला अत्याचाराच्या घटनेत मोठी वाढ झाली. यामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे. एकीकडे मुंबई पोलीस आरोपींच्या मुसक्या आवळत असताना दुसरीकडे वांद्रे परिसरातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. शाळेत काम करणाऱ्या एका नराधम शिपायाने ५ शाळकरी मुलींचा विनयभंग केला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या प्रकरणी पीडित मुलींनी शाळा प्रशासनाकडे तक्रार केली. शाळा व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी (Police) आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. रॉमबोस बावीकर असं अटक करण्यात आलेल्या आरोपी शिपायाचं नाव आहे. या संपूर्ण घटनेनंतर परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाचही पीडित मुली एकाच शाळेत (School) शिक्षण घेतात. आरोपी शिपाई देखील याच शाळेत काम करतो. शाळेत सहामाई परीक्षा असताना आरोपीने पाचही मुलींसोबत आक्षेपार्ह संभाषण केले. इतक्यावरच न थांबता आरोपीने मुलींना फोन करून त्याचा सोशल मीडियावरही पाठलाग केला.

२ ते ७ नोव्हेंबर या कालावधीत हा संपूर्ण घडला. सुरुवातील पाचही मुलींनी याकडे दुर्लक्ष केलं. मात्र, आरोपी अधिकच त्रास देत असल्याने त्यांनी या प्रकाराची तक्रार (Crime News) शाळा प्रशासनाकडे केली. शाळा व्यवस्थापकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

मुलंडमध्ये १५ वर्षीय मुलीचा विनयभंग

दाताचा एक्सरे काढण्यासाठी गेलेल्या १५ वर्षीय मुलीचा ओपीडीत काम करणाऱ्या २३ वर्षीय व्यक्तीने विनभंग केला. मुलुंड मधील एका रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला. आरोपीने एक्सरे काढताना मुलीला चुकीचा स्पर्श केला. याप्रकरणी पीडित मुलीने मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीनंतर मुलुंड पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल त्याला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PF: नोकरी बदलली? PF अकाउंट कसं ट्रान्सफर करायचं? ऑनलाइन स्टेप बाय स्टेप प्रोसेस वाचा

Sangli Rain : कृष्णा आणि वारणा नदीवरील १६ बंधारे पाण्याखाली; शेतांमध्ये साचले पाणी

Realme 15 आणि 15 pro सिरीजची एंट्री! जाणून घ्या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये काय आहे खास

Maharashtra Live News Update: रोहिणी खडसे घेणार पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट

Baramati Accident: सोन्यासारखा मुलगा आणि २ नातींचा अपघाती मृत्यू, धक्का सहन न झाल्याने आजोबांनीही सोडलं प्राण

SCROLL FOR NEXT