kalyan news, 5 bangladeshi nationals held in kalyan for illegal stay saam tv
मुंबई/पुणे

Kalyan News : कल्याण स्टेशननजीक पाच बांग्लादेशी महिलांसह आश्रयदात्यांना अटक

कल्याण ग्रामीण भागात बांग्लादेशी नागरीकांचे वास्तव्य वाढत आहे.

Siddharth Latkar

- अभिजित देशमुख

Kalyan News : कल्याण स्टेशन परिसरातुन पाच बांग्लादेशी महिलांना महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या पाच बांग्लादेशी महिलांमध्ये एका अल्पवयीन मुलीचा समावेश आहे. या महिलांना आश्रय देणाऱ्या एका भारतीय नागरीकाला देखील महात्मा फुले पोलिसांनी अटक केली आहे. (Maharashtra News)

कल्याण महात्मा फुले पोलिसांना काही बांग्लादेशी महिला कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे डीसीपी सचिन गुंजाळ,एसीपी कल्याणजी घेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरिक्षक अशोक होनमाने, पोलिस निरिक्षक श्रीनिवास देशमुख, प्रदीप पाटील, पोलिस उपनिरिक्षक प्रतिभा माळी यांच्या पथकाने कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचला.

त्यानंतर स्टेशन परिसरातून चार बांग्लादेशी महिलांना ताब्यात घेतले. यापैकी एक तरुणी अल्पवयीन होती . पोलिसांनी या महिलांकडे विचारपूस केली असता त्यांना भाषा कळत नव्हती. त्यांच्याशी हिंदी मराठी इंग्रजी या तिन्ही भाषात संवाद साधण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. त्यांना भाषा कळत नसल्याने पोलिसांनी या महिला बांग्लादेशी असल्याचा संशय आला. अखेर पोलिसांनी दुभाषकाची मदत घेत या महिलांकडून त्या कुठून आल्या? त्या कोण आहेत?याची माहिती घेतली.

तपासात या चौघी बांग्लादेशी असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी या चौघींना बोलविणारी महिला आखी अख्तर हिला देखील अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे आखी अख्तर ही गेल्या चार वर्षापासून नाव बदलून मुंबईत राहत आहे.

रितीका सिंग या नावाने ती मुंबई माहीम परिसरात राहत होती. बारमध्ये ती काम करीत होती. तिची ओळख डोंबिवली मानपाडा परिसरात राहणाऱ्या रघूनाथ मंडल याच्यासोबत झाली. स्वत:ची ओळख लपवून तिने रघूनाथशी लग्न केले.

इतकेच नव्हे तर बनावट कागदपत्रांच्या आधारे रितीका रघूनाथ मंडळ या नावाने आधार आणि पॅनकार्ड तयार केले. गेल्या सहा महिन्यापासून डोंबिवली मानपाडा परिसरात राहत होती. तिने या चार मुलींना बांग्लादेशातून या ठिकाणी आणल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले.

पोलिसांनी लूथफा आलाम, जोरना अख्तर, मासूमा जोमीरउद्दीन या तिघींसह अल्पवयीन तरुणीला ताब्यात घेतले आहे. त्यांना आश्रय देणाऱ्या रघूनाथ आणि पत्नी रितिका उर्फ आखी अख्तर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या बांग्लादेशी महिला भारतात कोणत्या कारणासाठी आल्या. त्यांना येण्यासाठी कोणी मदत केली का, त्यांच्यासोबत अन्य कोणी आले आहे का याचा तपास पोलिस करीत असल्याची माहिती कल्याणजी घेटे (कल्याण एसीपी) यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: मलबार हिलमधून मंगल प्रभात लोढा यांची विजयाकडे वाटचाल

Bribe Case : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

Cardamom Benefits: बहुगुणी वेलचीचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का?

Jharkhand Election Result: झारखंडमध्ये भाजपला धक्का, इंडिया आघाडीनं बहुमत गाठलं, कुणाला किती जागांवर आघाडी?

SCROLL FOR NEXT