Kalyan Crime News Saam Digital
मुंबई/पुणे

Kalyan Crime News: पत्नी, मुलांची हत्या...जादा मोबदल्याचं आमिष, हजारो नागरिकांची 400 कोटींची फसवणूक, कल्याणमधील व्यवसायिकाचा प्रताप

Sandeep Gawade

Kalyan Crime News

पत्नी आणि मुलांची हत्या करणाऱ्या कल्याणमधील एका व्यावसायिकाने हजारो लोकांची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तब्बल ३५०० जणांना ४०० कोटींचा गंडा घातला आहे. फसवणूक झालेल्या नागरिकांनी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांच्या नेतृत्वात कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांची भेट घेतली . या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढील कारवाई होणार असल्याची माहिती घेटे यांनी दिली आहे.

काही दिवसापूर्वी कल्याण पश्चिमेतील रामबाग परिसरात राहणाऱ्या महागड्या खेळणी विक्री व्यावसायिक दीपक गायकवाड याने त्याची पत्नी आणि सात वर्षाच्या मुलाची हत्या केली होती. त्यानंतर कल्याणच्या महात्मा फुले पोलिसांनी दीपक गायकवाड याला अटक केली. दीपक याच्या विरोधात अटकेची कारवाई केल्यानंतर मयत महिलेच्या नातेवाईकांनी दीपक गायकवाड याच्यासह त्याचा साथीदार आणि कुटंबियांच्या विरोधात गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात दीपक गायकवाड वगळता अन्य कोणावरही कारवाई झालेली नाही. कारवाईची मागणी सातत्याने होत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान शनिवारी सकाळी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात शिवसेना जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांच्या नेतृत्वात कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांची भेट घेतली. यावेळी प्रत्येक नागरिकांनी त्यांची व्यथा घेटे यांच्याकडे मांडली. अरविंद मोरे यांनी सांगितलं की, दीपक गायकवाड याने विविध कंपन्यांच्या माध्यमातून जवळपास ४०० कोटी रुपयांची फसवणूक केली आहे. जवळपास ३ हजार ५०० लोकांनी गायकवाड यांच्याकडे पैसे गुंतविले होते. जास्तीचा परतावा देण्याच्या नावाखाली दीपक गायकवाड याने नागरिकांची फसवणूक केली आहे.

यावेळी एसीपी घेटे यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढील कारवााईही होणार आहे. नागरिकांनी जास्तीचे पैसे कमविण्याच्या आमिषापोटी पैसे दिले होते. कोणत्याही प्रकारची चौकशी न करता गुंतवणूक केली आहे. दीपक काय करतो याची माहिती नागरिकांनी घ्यायला हवी होती. पैसे गुंतविले हे मान्य आहे. त्याचा तपास ही केला जाणार आहे. परंतू नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज असल्याचे सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale: कोण होणार बिग बॉस मराठी सीझन ५ चा विजेता? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका तारा भवाळकर, एकमताने पुण्यात निवड

VIDEO : तिरूपती बालाजीच्या प्रसादात किडे? धक्कादायक माहिती आली समोर

Marathi News Live Updates : नांदेडच्या सिडको भागात राहणाऱ्या 10 जणांना विषबाधा

IND vs PAK: भारत- पाकिस्तान सामन्यात इतिहास घडणार! दुबईत पहिल्यांदाच असं घडणार

SCROLL FOR NEXT