Maharashtra Coronavirus Cases SAAM TV
मुंबई/पुणे

Maharashtra Corona Update: मुंबईत दोन दिवसांत कोरोनाचे ३८ नवे रुग्ण; महाराष्ट्रात काय परिस्थिती? वाचा...

Maharashtra Coronavirus Cases: कोरोनाचा नवीन जेएन.१ व्हेरिएंटने राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्ला आरोग्य प्रशासनाकडून दिला जात आहे.

Satish Daud

Coronavirus Cases in Maharashtra

कोरोनाचा नवीन जेएन.१ व्हेरिएंटने राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्ला आरोग्य प्रशासनाकडून दिला जात आहे. दरम्यान, मागील ४८ तासांत मुंबईत तब्बल ३८ नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे, याच कालावधीत ६२ रुग्ण कोरोनाने बरे झाले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे. त्यामुळे मुंबईत (Mumbai) एकीकडे नवीन रुग्ण वाढत असले, तरी दुसरीकडे कोरोनावर मात करून रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणाऱ्या रुग्णांचं प्रमाणात चांगलं आहे. त्यामुळे कोरोनाची धास्ती धरून बसलेल्या मुंबईकरांसाठी ही काहीसी दिलासादायक बाब आहे.

राज्याबाबत बोलायचं झाल्यास गेल्या २४ तासांत ८७ कोरोना रुग्णांची (Coronavirus) नोंद झाली आहे. तर दिवसभरात दोघांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यभरातील कोरोना रुग्णांची संख्या एकूण ८१,७२,२८७ इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे मागील २४ तासांत राज्यात कोरोनाच्या 'जेएन.१' व्हेरिएंटचा एकही रुग्ण आढळला नाही.

देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ५२९ रुग्ण आढळले आहेत. यामुळे देशभरात सक्रिय रुग्णांची संख्या ४,०९३ इतकी झाली आहे. तर गेल्या २४ तासांत कोरोनाने ३ जणांचा मृत्यू झाला आहे. परंतु देशात 'जेएन.१' व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या १०० पार गेली आहे.

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता, राज्य सरकारने ७ सदस्यीय टास्कफोर्सची स्थापना केली आहे. ही टास्कफोर्स आयसीएमआरचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांच्या नेतृत्वात काम करणार आहे. राज्यातील कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणण्यासाठी टास्कफोर्स काम करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT