कल्याण-डोंबिवलीतल्या रस्त्यांसाठी 360.64 कोटी रुपयांचा निधी
कल्याण-डोंबिवलीतल्या रस्त्यांसाठी 360.64 कोटी रुपयांचा निधी प्रदिप भणगे
मुंबई/पुणे

कल्याण-डोंबिवलीतल्या रस्त्यांसाठी 360.64 कोटी रुपयांचा निधी

साम टिव्ही ब्युरो

प्रदिप भणगे

कल्याण : पावसाळ्यामुळे रस्त्यांवर पडलेले खड्डे आणि एकूणच रस्त्यांच्या दुरवस्थेतून कल्याण-डोंबिवलीकरांची लवकरच सुटका होणार असून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे एमएमआरडीएने तब्बल ३६०.६४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याआधी देखील, डोंबिवली एम.आय.डी.सी. निवासी विभागातील रस्त्याच्या कामासाठीही एकूण ११०.३० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला होता.

यामुळे पालकमंत्री व खासदार राजकारण करत असल्याच्या विरोधकांच्या आरोपांना सणसणीत चपराक बसली असून केवळ कागदी घोडे नाचवून आम्ही निधी मंजूर केला होता. असे खोटे चित्र उभे करणाऱ्या विरोधकांचाही पर्दाफाश झाला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेची आर्थिक अवस्था बिकट असल्यामुळे रस्ते विकासासाठी एमएमआरडीएने निधी द्यावा, यासाठी खा. डॉ. श्रीकांत शिंदे सातत्याने पाठपुरावा करत होते. पालकमंत्री एकनाथ शिंदे, एमएमआरडीएचे तत्कालीन आयुक्त आर. ए. राजीव, विद्यमान आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांच्या स्तरावर वारंवार बैठका घेतल्यानंतर खा. डॉ. शिंदे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

यामध्ये प्रामुख्याने ठाकुर्ली रेल्वे फाटक ते म्हसोबा चौकापर्यंत उन्नत मार्ग बांधणे व १५ मी रस्ता विकसित करणेकरिता (उड्डाणपूल) २०.०० कोटी, डोंबिवली पूर्व मानपाडा रस्ता (स्टार कॉलनी) ते समर्थ चौक रस्ता काँक्रिटीकरणासाठी ३४.५६ कोटी, आडिवली मलंगगड रोड ते आडिवली तलावापर्यंतच्या रस्त्यासाठी २१.३७ कोटी, कल्याण पूर्व (मलंगगड रोड – आरटीओ ऑफिस) ते म्हसोबा चौक ते माणेरे कमान रस्त्यासाठी १०.०० कोटी, व्हीनस चौक ते एस.एस.टी. कॉलेज - मोरयानागरी ते नागकन्या मंदिर – विटीसी ग्राउंड ते श्रीराम चौक पर्यंत व अंतर्गत रस्ते सी.सी. करण्यासाठी १७.००, शीळ रस्ता ते संदप-उसरघर रस्ता

काँक्रिटीकरणासाठी १६.५६ कोटी, डोंबिवली पूर्व गजानन चौक ते (नांदिवली) नालापर्यंत रस्ता काँक्रिटीकरणासाठी १४.४० कोटी, आणि शहरातील अन्य रस्त्यांसाठी म्हणजेच डोंबिवली विधानसभा क्षेत्राकरिता ८७.१३ कोटी, कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांकरिता १११.९३ कोटी, कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांकरिता १२३.५९ कोटी, त्याचबरोबर कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांकरिता ३७.९६ कोटी असा एकूण तब्बल ३६०.६४ कोटी रुपयांचा निधी एमएमआरडीएने खा. डॉ. शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर केला आहे.

एमएमआरडीएच्या या निधीमुळे अनेक रस्त्यांची दुरुस्ती, अस्तित्वातील डीपी रस्त्यांचा विकास, दुपदरीकरणाच्या कामाला वेग येणार आहे. सदर विकासकामे एमएमआरडीए प्रशासन स्वतः करणार असल्याचेही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. त्यामुळे या शहरातील वाहतूक अधिक वेगवान होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. खा. डॉ. शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, आणि एमएमआरडीएचे आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांचे आभार मानले आहेत.

विरोधक वैफल्यग्रस्त:

केवळ कागदी घोडे नाचवून निधी मंजूर झाल्याचे चित्र निर्माण करायचे, यात तत्कालीन सत्ताधारी आणि सध्या विरोधी पक्षाचे असलेले आमदार यातचं रमल्यामुळे कल्याण-डोंबिवलीकरांना चांगल्या रस्त्यांपासून वंचित राहावे लागले, असा टोला खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लगावला.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi News | गर्दी गोंधळ आणि एकच राडा! राहुल गांधींच्या 'त्या' सभेत काय घडलं?

Farooq Abdullah: मोठी बातमी! फारुख अब्दुल्ला यांच्या सभेत चाकूहल्ला

Hair Removal Creams: शरीरावरील अनावश्यक केस काढण्यासाठी हेअर रिमूव्हल क्रीम वापरताय?

Today's Marathi News Live: अवकाळी पावसामुळे मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक मंदावली

Pune Hit and Run Case | सकाळी अटक दुपारी जामीन! पुणे हिट अपघात प्रकरणात मोठा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT