- सचिन जाधव
Pune Crime News : पुण्यातील वाढती गुन्हेगारी माेडीत काढण्यासाठी पाेलिसांनी कंबर कसली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे पोलिसांनी वेगवेगळ्या टाेळ्यांवर कारवाई करण्याचा धडाका लावला आहे. या माेहिमेत पाेलिसांनी सहकारनगर (sahakar nagar) येथे घडलेल्या वाहनांच्या ताेडफाेड प्रकरणी 31 जणांना अटक केली आहे. (Maharashtra News)
पुण्यात सहकारनगर परिसरात चार दिवसांपूर्वी झालेल्या माेठ्या प्रमाणात गाड्यांची तोडफोड झाली हाेती. सहकारनगरमधील अरण्येश्वर परिसरात हा प्रकार घडला हाेता. दोन गटांमध्ये हाणामारी झाली होती. त्यातून गाड्यांची ताेडफाेड करण्यात आली हाेती. हे प्रकरण पाेलिसांपर्यंत पाेहचले हाेते.
पाेलिसांनी या प्रकरणी ३१ लोकांना अटक केली आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार अरण्येश्वर परिसरामध्ये गाड्यांची तोडफोड झाली हाेती. या घटनेनंतर प्राथमिक तपासाअंती दोन्ही गटातील ३१ लोकांना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा कसून तपास सुरु आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.