Animals Injured By Firecrackers  Saam TV
मुंबई/पुणे

माणसांची दिवाळी, प्राण्यांवर संक्रांत! मुंबईत फटाक्यांमुळे जखमी झालेल्या प्राण्यांमध्ये ३० टक्क्यांनी वाढ

Animals Injured By Firecrackers in Mumbai: मुंबईतील परळच्या पशु रुग्णालयात सध्या तीनशे ते चारशे प्राणी उपचार घेत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भूषण शिंदे, मुंबई

Diwali 2022 Latest News: दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त दिवाळी असल्याने देशभरात दिवाळीचा उत्साह शिगेला आहे. देशभरात दिवाळी उत्साहात साजरी केली जात आहे. फटाक्यांची (Firecrackers) आतिषबाजीही मोठ्या प्रमाणात होत आहे. या फटाक्यांच्या असुरक्षित वापरामुळे मात्र, अनेक दुर्घटनाही घडल्या आहेत. कुठे आग लागली, कुठे लोक जखमी झाले. काही ठिकाणी मृत्यूही झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याशिवाय वायू प्रदूषणामुळे होणारा त्रास तो वेगळाच. हे सगळं झालं माणसांचं... पण मुक्या प्राण्यांचं (Animals) काय?

फटाक्यांचा जितका त्रास माणसांना होतो, त्याच्या कितीतरी पटींनी अधिक मुक्या प्राण्यांना होतो. यंदाच्या दिवाळीत मुंबईत फटाक्यांमुळे जखमी झालेल्या मुक्या प्राण्यांच्या संख्येत साधारण ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. पशु वैद्य राजीव गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली आहे. (Mumbai Firecrackers News)

नुकतीच दिवाळी उत्साहात पार पडली. अनेकांनी फटाके फोडत आतिषबाजी केली. मात्र हे फटाके आणि त्यातून होणाऱ्या आवाजाला अनेक मुके प्राणी बळी पडतात. अनेकदा फटाक्यांमुळे जखमी होतात तर, अनेकदा फटाक्यांच्या आवाजामुळे भयभीत होऊन सैरावैरा पळतात आणि एखाद्या अपघाताला बळी पडतात. यंदा मुंबईत फटाक्यांमुळे जखमी प्राण्यांच्या संख्येत साधारण ३० टक्के इतकी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. याबाबत पशु वैद्य राजीव गायकवाड यांनी माहिती दिली आहे. मुंबईतील परळच्या पशु रुग्णालयात सध्या तीनशे ते चारशे प्राणी उपचार घेत आहेत. (Mumbai Latest News)

दरवर्षी दिवाळीमध्ये दिवसाला १० ते १५ प्राणी फटाक्यांमुळे जखमी होऊन रुग्णालयात उपचार घ्यायला दाखल व्हायचे. यंदा या संख्येत वाढ होऊन या दिवाळीमध्ये दिवसाला २० ते ३० प्राणी दाखल होत आहेत. या संख्येत साधारणतः ३० टक्क्यांनी वाढ झाल्याची रुग्णालयाची नोंद आहे. या प्राण्यांमध्ये मुख्यतः भटके कुत्रे, मांजरी, पाळीव कुत्रे आणि पक्ष्यांचा समावेश आहे. त्यामुळे माणसांची दिवाळी म्हणजे प्राण्यांवर आलेली संक्रांत (संकट) बनली आहे, हे कटू सत्य नाकारता येणार नाही.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: इस्लामपूरमध्ये जयंत पाटील आघाडीवर

Maharashtra Election Result : राज्यात कोणाला झटका, कोणाला धक्का? बाळासाहेब थोरात, सावंत ते सत्तार पिछाडीवर

Gulabrao Patil News : लाडक्या बहीणींचा आशीर्वाद मत पेटीतून आला आहे, गुलाबराव पाटील यांची मोठी प्रतिक्रिया

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य

Bribe Case : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

SCROLL FOR NEXT