धक्कादायक! अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; चिमुकली बचावली Saam Tv
मुंबई/पुणे

धक्कादायक! अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू; चिमुकली बचावली

जिल्ह्यातील शिक्रापूर या ठिकाणी हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : जिल्ह्यातील शिक्रापूर या ठिकाणी हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. एका रस्त्याच्या कडेला दुचाकी थांबवून हे कुटुंब फोनवर बोलत होते. या दुःखद अपघातात एकाच कुटुंबामधील ३ जणांचा मृत्यू झाला आहे. ३ वर्षीय चिमुकली या अपघातातून बचावली आहे आणि गंभीर जखमी झाली आहे.

या प्रकरणाचा पोलिसांनी गुन्हा दाखल करून, आरोपी कंटेनर चालकाला अटक करण्यात आली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. अशोक दगडू पवार (वय- ४५), सारिका अशोक पवार (वय-४०) आणि अनु अशोक पवार (वय-७ महिने) अशी मृतांची नावे आहेत. सर्व संबंधित जटेगाव बुद्रुकचे रहिवासी आहेत.

हे देखील पहा-

या घटनेत जखमी झालेल्या ३५ वर्षीय चिमुकलीचे नाव शुभ्रा अशोक पवार असे आहे. या दुर्दैवी अपघात मध्ये 3 वर्षीय चिमुकलीला तिचे आई- वडील आणि ७ महिन्यांच्या धाकट्या बहिणीने प्राण सोडला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. मृत अशोक पवार हे पत्नी आणि २ मुलींसह शिक्रापूर- चाकण रस्त्यावर प्रवास करत होते. दरम्यान, जातेगाव फाट्यावरून निघत असताना त्यांना फोन आला.

यामुळे पवारांनी रस्त्याच्या कडेलाच असलेल्या एका हॉटेलसमोर आपली दुचाकी थांबवली होती आणि ते कॉलवरती बोलू लागले होते. दरम्यान, भरलेल्या कंटेनरने त्यांना मागून जोरात धडक दिली आहे. यामुळे हा भीषण अपघात होता की, दुचाकीसह संपूर्ण पवार कुटुंब कंटेनरखाली चिरडले गेले आहे. सुदैवाने ३ वर्षीय चिमुकली यामध्ये बचावली आहे. घटना घडताच स्थानिकांनी आरोपी कंटेनर चालकाला पकडून शिक्रापूर पोलिसांनच्या ताब्यात दिले आहे.

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्वांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी तिघांना देखील मृत घोषित केले आहे. आणि जखमी ३ वर्षांच्या मुलीवर उपचार सुरू आहेत. बालाजी संजय येलगेट असे आरोपी कंटेनर चालकाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक करण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शींनी कंटेनर चालक वेगाने जात असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. यासंदर्भात पुढील कारवाई केली जात आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gokul Milk : कोल्हापूरचा गोकुळ दूध ब्रँड आता आईस्क्रीमसह बाजारात, मोठी घोषणा

Maharashtra Live News Update: हिंगोलीत ओढ्याला पूर येऊन गावकऱ्यांचा संपर्क तुटला

Akola Crime : अकोला हादरलं! चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, सकल हिंदू आक्रमक

Smartphone Hanging: तुमचा फोन वारंवार हॅंग होतो का? मग 'या' टिप्स करा फॉलो

Balen Shah: Gen-Z क्रांती! कर्नाटकात शिक्षण, नंतर महापौर, प्रसिद्ध रॅपर नेपाळचा कारभार हाकणार?

SCROLL FOR NEXT