धर्मांतरासाठी अर्थसहाय्य करणाऱ्या यवतमाळच्या तरुणाला कानपूरमधून अटक
धर्मांतरासाठी अर्थसहाय्य करणाऱ्या यवतमाळच्या तरुणाला कानपूरमधून अटकसंजय राठोड

धर्मांतरासाठी अर्थसहाय्य करणाऱ्या यवतमाळच्या तरुणाला कानपूरमधून अटक

यवतमाळ येथील वाघापूर परिसरातील पटवारी कॉलनीमध्ये राहणार्‍या एका कंत्राटदार युवकास लखनऊ एटीएस (विशेष तपास पथक) ने उत्तर प्रदेशातील कानपूर या ठिकाणी अटक करण्यात आली

संजय राठोड

यवतमाळ : यवतमाळ येथील वाघापूर परिसरातील पटवारी कॉलनीमध्ये राहणार्‍या एका कंत्राटदार युवकास लखनऊ एटीएस (विशेष तपास पथक) ने उत्तर प्रदेशातील कानपूर या ठिकाणी अटक करण्यात आली आहे. मागील काही महिन्यात धर्मांतराशी संबंधित टोळीतील सदस्य यवतमाळ जिल्ह्यातील असल्याचे एटीएसच्या तपासात उघड झाले आहे.

लखनऊ एटीएसने मागील महिन्यात पुसद येथील डॉ. फराज शहा याला अटक केली होती. त्याचा यवतमाळच्या या युवकाशी सबंध असल्याचे उघड झाल्याने एटीएसने ही कारवाई केली आहे. धीरज गोविंद जगताप (वय- 38) असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे. धीरज हा पुसद शहरातील वसंतनगर भागात राहणारा डॉ. फराज शहा याच्या सोबत धर्मांतराचे काम करत होता.

हे देखील पहा-

डॉ. फराज शहा याला अटक केल्यानंतर तपासात धीरज जगतापचे नाव समोर आले आहे. या घटनेमुळे धर्मांतरासाठी काम करणार्‍या मोठ्या रॅकेटचा भांडाफोड झाला आहे. त्याअंतर्गत राज्यासह देशभरात विविध ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. याच कारवाईचा भाग म्हणून यवतमाळ शहरातील धीरज जगताप या युवकाला कानपूर मधून अटक करण्यात आली आहे.

धीरज हा सुखवस्तू कुटुंबातील असून, तो व्यवसायाने बांधकाम कंत्राटदार म्हणून काम करत होता. मात्र, काही दिवसापूर्वी धर्मांतर तो घराबाहेर पडला, तेव्हापासून तो घरीदेखील फिरकला नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले आहे. त्याची पत्नी छोट्या मुलीला घेऊन माहेरी निघून गेली आहे. लखनऊ एटीएसने धिरजला अटक केल्याची माहिती मिळाल्यानंतर यवतमाळ मधील स्थानिक एटीएसच्या पथकाने त्याच्या वाघापूर परिसरातील घराची पाहणी केली आहे.

धर्मांतरासाठी अर्थसहाय्य करणाऱ्या यवतमाळच्या तरुणाला कानपूरमधून अटक
उतावळा नवरा घुडग्याला बाशिंग! चक्क Pressure cooker सोबतच केलं लग्न

मात्र, त्याचे वृद्ध आई- वडील त्याठिकाणी राहत असल्याचे लक्षात आले आहे. धीरज बाबत त्याठिकाणी फारशी कुणालाही माहिती नाही. धीरज हा धर्मांतराप्रकियेत लोकांना अर्थसहाय्य करत असल्याचा आरोप आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. या घटनेमुळे मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धीरज यवतमाळ मधील एका राजकीय पुढार्‍यांच्या संपर्कात असल्याची माहिती धीरजच्या बहिणीने दिली आहे. स्थानिक एटीएस तपास करत आहे. यामुळे या प्रकरणात आणखी कोण कोण आहे. याचा सुगावा लावण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com