Eknath Shinde News in Marathi, Maharashtra Assembly Session, Raigad News Saam Tv
मुंबई/पुणे

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या '३' मोठ्या घोषणा; हिरकणी गावच्या विकासासाठी २१ कोटी तर इतरही आश्वासनं

Maharashtra Political News : दुसरी घोषणा म्हणजे राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी इंधनावरील व्हॅट कमी करण्याबाबत निर्णय लवकरच घेण्यात येईल असं आश्वासन यावेली विधानसभेत देण्यात आलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: विधानसभेत शिंदे सरकार आज बहुमताची परिक्षा पास झाले. १६४ मतं मिळवत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विश्वास ठराव जिंकला. सर्वपक्षीय नेत्यांच्या भाषणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात विरोधकांच्या अनेक आरोपांवर उत्तर दिलं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ३ मोठ्या घोषणा केल्या आहेत. (Eknath Shinde Latest News)

हे देखील पाहा -

विश्वासदर्शक ठराव जिंकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३ मोठ्या घोषणा केल्या आहे. यात पहिली घोषणा म्हणजे रायगडाच्या (Raigad) पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी २१ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. दुसरी घोषणा म्हणजे राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी इंधनावरील व्हॅट कमी करण्याबाबत निर्णय लवकरच घेण्यात येईल असं आश्वासन यावेली विधानसभेत देण्यात आलं आहे. सोबत तिसरी घोषणा म्हणजे 'शेतकरी (Farmers) आत्महत्यामुक्त महाराष्ट्र' करण्याचा निर्धार शिवसेना-भाजप युती सरकारचा आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. (3 Big Announcement OF Cm Eknath Shinde)

...तर गावाला शेती करायाला जाऊ

गुजरातचं नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी काही प्लॅनिंग नाही केली, मी बोलत बोलत गेलो त्यात लपवायचे काय? फडणवीसांच (Devendra Fadnavis) आणि आमचं ट्यूनिंग चांगलं आहे. त्यांचा आणि आमचा अजेंडा सेम आहे. आम्ही हिंदुत्वाचा पुरस्कार केला तिकडे गेलो. पुढच्या विधानसभेत भाजप आणि आम्ही दोघे मिळून २०० लोक निवडून येऊ असं मुख्यमंत्री म्हणाले. तसेच शिवसेनेच्या चिन्हाबाबतही त्यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, चिन्ह काय मिळणार? आपण शिवसैनिक जिथे लाथ मारू तिथून पाणी काढू. पन्नासमधील एकही माणूस पडू देणार नाही. तसेच पुढच्या विधानसभा निवडणुकीत २०० लोक निवडून आणू जर तसं झालं नाही तर गावाला शेती करायाला जाऊ अंस मोठं वक्तव्यं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केलं आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT