Eknath Shinde : ...तर मी गावाला शेती करायला जाईन; विधानसभेत मुख्यमंत्र्यांंचं मोठं वक्तव्य

Maharashtra Politics : पुढच्या विधानसभेत २०० लोक निवडूण आणू, असं नाही झालं तर गावाला शेती करायला जाऊ असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
Eknath Shinde Latest News
Eknath Shinde Latest Newssaam tv

रश्मी पुराणिक

मुंबई: विधानसभेत शिंदे सरकार आज बहुमताची परिक्षा पास झाले. १६४ मतं मिळवत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विश्वास ठराव जिंकला. सर्वपक्षीय नेत्यांच्या भाषणानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात विरोधकांच्या अनेक आरोपांवर उत्तर दिलं. यावेळी त्यांनी मोठं वक्तव्यं केलं आहे. पुढच्या विधानसभेत २०० लोक निवडूण आणू, असं नाही झालं तर गावाला शेती करायला जाऊ असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. (Eknath Shinde Latest News)

हे देखील पाहा -

गुजरातचं नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मी काही प्लॅनिंग नाही केली, मी बोलत बोलत गेलो त्यात लपवायचे काय? फडणवीसांच आणि आमचं ट्यूनिंग चांगलं आहे. त्यांचा आणि आमचा अजेंडा सेम आहे. आम्ही हिंदुत्वाचा पुरस्कार केला तिकडे गेलो. पुढच्या विधानसभेत भाजप आणि आम्ही दोघे मिळून २०० लोक निवडून येऊ असं मुख्यमंत्री म्हणाले. तसेच शिवसेनेच्या चिन्हाबाबतही त्यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, चिन्ह काय मिळणार? आपण शिवसैनिक जिथे लाथ मारू तिथून पाणी काढू. पन्नासमधील एकही माणूस पडू देणार नाही. तसेच पुढच्या विधानसभा निवडणुकीत २०० लोक निवडून आणू जर तसं झालं नाही तर गावाला शेती करायाला जाऊ अंस मोठं वक्तव्यं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केलं आहे.

Eknath Shinde Latest News
कामाख्या देवी म्हणाली 'तो' रेडा आम्हाला नको; एकनाथ शिंदेंचा राऊतांना टोला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, 'मी शिवसैनिक आहे, आता लढून शहीद झालो तरी चालेल, पण आता माघार नाही. शिवसेना वाचवायला शहीद होईन. आमदारांना सांगितलं होतं चिंता करू नका. तुमची आमदारकी अडचणीत आली तर सांगेन की, हे का झालं, कशासाठी झालं हे शोधायला पाहिजे होतं', असेही शिंदे म्हणाले. 'माझ्याकडे चर्चेसाठी लोक पाठवली आणि दुसरीकडे घरावर दगडफेक चर्चा करायची. एकनाथ शिंदेंच्या घरावर दगडफेक करणारा जन्माला आला नाही. मला मानणारे हजारो लोक आहेत. ही माणसं म्हणजे मधमाशाचं पोळ आहे. मी शिवसेनेसाठी जीवाचं रान केलं, रक्ताचे पाणी केलं. वयाच्या सतराव्या वर्षी बाळासाहेब विचाराने वेडा झालो. वयाच्या अठराव्या वर्षी शाखाप्रमुख झालो. वयाच्या अठराव्या वर्षी शाखाप्रमुख झालो. मी दिघे साहेबांनी सांगितलं, वरिष्ठ लोकांना संधी द्या. मला त्यांनी सांगितलं मला शिकवू नको. मला पदाची लालसा केली नाही. लवकर पुढे जायचं विचार केला नाही. मी नगरसेवक झालो,काम केलं. त्यानंतर मागे वळून पाहिलं नाही', असं देखील शिंदे म्हणाले.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com