Local Train Accident Death  Saam tv
मुंबई/पुणे

Local Train Accident Death : लोकल गर्दीचे बळी सुरूच; लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू, मागील २ महिन्यांतील पाचवा बळी

Local Train Accident Death Update : लोकल ट्रेनमधून पडून प्रवाशांचा मृत्यू होण्याचे प्रमाण सुरुच आहे. शुक्रवारी सायंकाळी पुन्हा एका धावत्या लोकलमधून पडून प्रवाशाचा मृत्यू झाला आहे.

Vishal Gangurde

ठाणे : लोकल ट्रेनमधून पडून प्रवाशांचा मृत्यू होण्याचे प्रमाण सुरुच असल्याचे समोर येत आहे. शुक्रवारी सायंकाळी पुन्हा एका प्रवाशाचा धावत्या लोकलमधून पडून मृत्यू झाला आहे. मागील दोन महिन्यातील या मार्गावरील पाचवी घटना घडली आहे. सतत होणाऱ्या घटनेमुळे लोकल प्रवासाविषयी चिंता व्यक्त होऊ लागली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या मेन लाईनवर पुन्हा एकदा प्रवाशाचा पडून मृत्यू झाला. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एक अनोळखी तरुणाचा कल्याणहून छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे जाणाऱ्या लोकलमधून मुंब्रा व कळवा दरम्यान पडून मृत्यू झाला. मुंब्रा व कळवा दरम्यान पारसिक बोगद्याच्या जलद मार्गावर तोल जाऊन लोकलमधून पडला.

या घटनेची रेल्वे सुरक्षा बलाचे सहपोलीस निरीक्षक रमेश ताजने यांना मिळाली होती. त्यानंतर ताजने व त्यांचे सहकारी सोणकडे यांनी या अनोळखी 28 वर्षीय तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या तरुणाला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या तरुणाचं नाव , पत्ता, ओळख पटली नाही. या विषयी ठाणे लोहमार्ग पोलीस उपनिरीक्षक आर डी गोसावी तपास करीत आहेत.

लोकल गर्दीचा पाचवा बळी

गेल्या २ महिन्यात मंब्रा व कळवा दरम्यान गर्दीमुळे लोकलमधून पडून ५ व्या प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कळवा कारशेडमधील अतिरिक्त राखीव एसी लोकल मुंब्रा ते ठाणे दरम्यान चालवाव्यात, अशी मागणी मुंबई उपनगरी रेल्वे प्रवासी संघटनेचे सरचिटणीस सिद्धेश देसाई यांनी केली आहे.

'कोकणकन्ये'तून पडून प्रवाशाचा मृत्यू

कोकणकन्या एक्सप्रेसमधील गर्दीतून पडून एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एक्सप्रेसला लटकत प्रवास करत असताना पडून प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अमित पवार असे प्रवाशाचे नाव आहे. मूळचा सिंधुदुर्ग येथील व्यक्ती हे कांदिवली चोरकोप येथे वास्तव्यास होते. जनरल डब्याच्या दरवाज्यात लटकून प्रवास करताना हा अपघात झाला. या घटनेने अमित पवार यांच्या कुटुंबावर मोठा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा उमेदवार ठरला

Sambhajinagar Tourism : संभाजीनगरजवळील ऐतिहासिक अन् सांस्कृतिक खजिना, लहान मुलांसोबत पिकनिकला उत्तम ठिकाण

Pune Crime : पुण्यातील धक्कादायक घटना, गॅस सिलिंडरच्या टाकीने ठेचून हत्या, कारण वाचून थक्क व्हाल

Maharashtra Politics: भाजप आमदार अन् मंत्र्यांना रवींद्र चव्हाणांचा इशारा, प्रदेशाध्यक्ष का संतापले?

Marathi Actress Wedding : मराठमोळ्या अभिनेत्रीचा थाटात पार पडला लग्नसोहळा, नवऱ्यासोबतचा पहिला फोटो आला समोर

SCROLL FOR NEXT