Ganja Seized and two culprit arrested saam tv
मुंबई/पुणे

डोंबिवलीत 272 किलो गांजा जप्त, दोन आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत .

प्रदीप भणगे

डोंबिवली : मानपाडा पोलिसांनी ओडिसावरून 272 किलो गांजाची तस्करी (Ganja Smuggling) करणाऱ्या दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत .फैजल फारुख ठाकूर आणि मोहम्मद आतीफ हाजीजउल्ला अन्सारी (Two culprit arrested) अशी या आरोपींची नावे आहेत. या आरोपींकडून 263 किलो गांजा (Ganja Seized), 6 मोबाईल, एक इनोव्हा कार, असा 27 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे . हा गांजा कोणासाठी व कोणाला विक्रीसाठी आणला होता, याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी नाकाबंदी व छापे टाकून गांजा विकणाऱ्या व गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.दोन व्यक्ती उडीसा येथून डोंबिवलीत मोठ्या प्रमाणावर गांजा विक्रिसाठी आणणार असल्याची खबर मानपाडा पोलीस ठाण्याचे एपीआय अनिल भिसे यांना मिळाली होती. त्यानंतर मानपाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली एका पथकाकडून डोंबिवली मानपाडा परिसरात शोधमोहीम सुरु होती.

या शोधमोहीम दरम्यान डोंबिवली मधील उंबार्ली गावात एक संशयास्पद इनोव्हा कार उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर मानपाडा पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन कारमालकाची विचारपूस सुरू केली.पोलिसांच्या चौकशी दरम्यान ईनोव्हा कारमधील आरोपीने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलिसांनी कारची झडती घेत कारमधून 272 किलो गांजा जप्त केला. त्यानंतर पोलिसांनी आरोपींची कसून चौकशी केली. गांजा ठाणे व ठाण्याजवळील उपनगरीमध्ये छोटे-मोठे गांजाच्या व्यापाऱ्यांना तस्करी करून विक्रीसाठी देत असल्याची कबुली चौकशीदरम्यान आरोपींनी दिली.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sara Ali Khan: पतौडीच्या राजकुमारीचे क्यूट बार्बी डॉल लूक पाहिलेत का?

Mental Health: तुमची मानसिक स्थिती बदलत आहे का? 'या' ५ लक्षणांवर लक्ष ठेवा

Ladki Bahin Yojana : 'पोर्टल बंद, नव्या नोंदणी होणार नाहीत'; उद्धव ठाकरेंनी लाडक्या बहिणींचं भविष्यच सांगितलं

Sleep Internship: पुण्याच्या तरुणीने दररोज ९ तास झोप काढून कमावले ९ लाख रुपये; नेमकी नोकरी आहे तरी कोणती?

Vastu for cleaning: घरात सकाळी की संध्याकाळी लादी पुसावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार योग्य वेळ

SCROLL FOR NEXT