viren jadhav  Saam tv
मुंबई/पुणे

Crime : 'प्रतिष्ठित कंपनीत नोकरी, चांगला पगार, तरी आनंद मिळत नाही...'; २७ वर्षांच्या इंजिनियरने घेतला टोकाचा निर्णय

चांगल्या कंपनीत, चांगल्या पगाराची नोकरी असूनही मला आनंद मिळतं नाही, म्हणून एका तरुणाने इमारतीच्या 11 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे.

गोपाल मोटघरे

पुणे : पुण्यातील धक्कादायक घटना समोर आली आहे. चांगल्या कंपनीत, चांगल्या पगाराची नोकरी असूनही मला आनंद मिळतं नाही, म्हणून एका तरुणाने इमारतीच्या 11 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. पिंपरी-चिंचवड शहरात ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

पिंपरी-चिंडवडमधील चिखली परिसरातील रिव्हर रेसिडेन्सी या सोसायटीमध्ये आज सकाळी आठ वाजता दरम्यान ही धक्कादायक घटना घडली आहे. विरेन जाधव असं आत्महत्या केलेल्या 27 वर्षाच्या अभियंता तरुणाचे नाव आहे.

वीरेन जाधव हा टाटा मोटर्समध्ये इंजिनियर ह्या पदावर कार्यरत होता. मूळचा नाशिक (Nashik) जिल्ह्यातील रहिवासी असलेला विरेन जाधव हा चिखली परिसरातील रिव्हर रेसिडेन्सी या सोसायटीमध्ये आपल्या आईसोबत सध्या राहत होता.

वीरेन जाधव याने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या नोटबुक मध्ये आपल्या आत्महत्या करण्याबद्दलचे कारण लिहून ठेवला आहे. मला चांगल्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी (Job) आहेत तरी मला आनंद मिळत नाही, असं लिहून वीरेन जाधव यांनी आपलं जीवन संपवला आहे.

विरेन जाधव यांच्या मृत्यू संदर्भात सध्या चिखली पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वीरेन जाधव हा मानसिक दृष्ट्या थोडा अस्वस्थ असावा, त्यामुळे त्यांनी आत्महत्या करण्यासारखा टोकाचा पाऊल उचलला असावा, अशी प्राथमिक माहिती चिखली पोलिसांनी दिली आहे.

वीरेनच्या आत्महत्येने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्याच्या आत्महत्येने कुटुंबावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. वीरेनच्या आत्महत्येने त्याच्या कंपनीतील सहकाऱ्याकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: थोड्याच वेळात राहुल गांधींची पत्रकार परिषद, काय बोलणार?

Eknath Shinde : नोटीस कोणत्या अधिकाराने थांबवली? उच्च न्यायालयाचा एकनाथ शिंदेंना सवाल |VIDEO

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र आल्याने मविआवर परिणाम होणार का? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं

Aishwarya Rai-Salman Khan Breakup : "तो भिंतीवर डोके आपटायचा..." लोकप्रिय दिग्दर्शकाचं ऐश्वर्या-सलमानच्या नात्यावर विधान

चकमकीत आरोपीकडून पोलिसांवर हल्ला, गोळीबारात ३ पोलिसांचा मृत्यू, हल्लेखोराला संपवलं

SCROLL FOR NEXT