Tu Meri Main Tera Main Tera Tu Meri ची बॉक्स ऑफिसवर जादू फेल, 2 दिवसांत फक्त 'इतकी' कमाई

Tu Meri Main Tera Main Tera Tu Meri Box Office Collection Day 2 : कार्तिक आर्यनचा 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' चित्रपट रिलीज होऊन दोन दिवस झाले आहे. चित्रपटाने किती कमाई केली जाणून घेऊयात.
Tu Meri Main Tera Main Tera Tu Meri Box Office Collection Day 2
Tu Meri Main Tera Main Tera Tu Merisaam tv
Published On
Summary

'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' चित्रपट 25 डिसेंबर 2025ला रिलीज झाला आहे.

'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' चित्रपटात कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडेचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे.

'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' सिनेमा एक रोमँटिक ड्रामा आहे.

ख्रिसमस 2025 ला बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री अनन्या पांडे यांचा 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' चित्रपट रिलीज झाला आहे. हा एक रोमँटिक ड्रामा आहे. 'धुरंधर', 'अवतार 3' नंतर आता 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' सिनेमा बॉक्स ऑफिसवर आला आहे. मात्र कार्तिकच्या चित्रपटाने संथ सुरुवात केली आहे. आजही बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर'ची हवा पाहायला मिळत आहे. कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडेचा रोमँटिक अंदाज आणि केमिस्ट्रीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' बॉक्स ऑफिस कलेक्शन

'धुरंधर'सोबत सध्या बॉक्स ऑफिसवर 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' चित्रपट पाहायला मिळत आहे. Sacnilk च्या रिपोर्टनुसार,'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' चित्रपटाने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 5.00 कोटी रुपयांची कमाई केली आहे. दोन दिवसांत सिनेमाने एकूण 12.75 कोटी रुपये कमावले आहेत. तर चित्रपटाने जगभरात अंदाजे 17.25 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

  • पहिला दिवस - 7.75 कोटी रुपये

  • दुसरा दिवस - 5.00 कोटी रुपये

  • एकूण - 12.75 कोटी रुपये

मीडिया रिपोर्टनुसार, 'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' हा चित्रपट 90 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवला आहे. चित्रपटात मुख्य भूमिकेत कार्तिक आर्यन आणि अनन्या पांडे झळकले आहेत. तसेच या चित्रपटात नीना गुप्ता, जॅकी श्रॉफ, अरुणा इराणी आणि टिकू तलसानिया यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट समीर विद्वांस यांनी दिग्दर्शित केला आहे. चित्रपटातील गाणी सोशल मीडियावर तुफान गाजत आहे. हा चित्रपट वीकेंडला किती कमाई करतो पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' रिव्ह्यू

'तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी' चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. अनेक प्रेक्षकांना हा चित्रपटातील दृश्ये, आकर्षक संगीत आणि भावनिक गुंता, हलकाफुलका, आनंददायी रोमँटिक अंदाज खूप आवडला आहे. तर काही प्रेक्षकांना चित्रपटाची कथा कालबाह्य वाटली.

Tu Meri Main Tera Main Tera Tu Meri Box Office Collection Day 2
HBD Salman Khan : आखा बॉलिवूड एक तरफ और सलमान खान एक तरफ; भाईजानची जंगी बर्थडे पार्टी, सेलिब्रिटी ते क्रिकेटपटू सर्वांनी लावली हजेरी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com