कपडे काढून मोलकरणीला मारहाण; 25 वर्षीय अभिनेत्रीला अटक Saam Tv
मुंबई/पुणे

कपडे काढून मोलकरणीला मारहाण; 25 वर्षीय अभिनेत्रीला अटक

घरात काम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला मारहाण आणि अत्याचार केल्याप्रकरणी एका २५ वर्षीय अभिनेत्रीला अटक करण्यात आली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. घरात काम करणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला मारहाण आणि अत्याचार (abusing) केल्याप्रकरणी एका २५ वर्षीय अभिनेत्रीला अटक करण्यात आली आहे. वर्सोवा पोलिसांनी (police) ही कारवाई केली आहे. काम वेळेवर पूर्ण न केल्यामुळे अभिनेत्रीनेच चक्क अल्पवयीन घरगुती मोलकरणीचा छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या अभिनेत्रीवर (actress) मुलीचे कपडे काढून तिला त्रास केल्याचा आरोप (Allegations) लावण्यात आले आहेत. वेळेवर काम पूर्ण न केल्यामुळे संतापलेली अभिनेत्री घरात काम करणाऱ्या मुलीला मारहाण करायची असे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्रीवर मुलीवर अत्याचार (atrocity) केल्याचा आरोप आहे. ही अभिनेत्री इंडस्ट्रीत स्ट्रगल करत असल्याचे सांगितले जात आहे. या अल्पवयीन मुलीने याअगोदर कधीही तक्रार केली नव्हती. (25 year old actress has been arrested)

हे देखील पहा-

मात्र, आता सर्वात धक्कादायक म्हणजे अभिनेत्रीने तिच्यावर अत्याचार तर केलेच पण जबरदस्तीने कपडे काढून व्हिडिओ आणि फोटो देखील काढले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार की, पीडित तरुणी गेल्या ४ महिन्यांपासून आरोपीच्या फ्लॅटवर काम करत होती. अभिनेत्रीला मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती होती. तरीही तिने तिला कामावर ठेवले होते.

पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार की, आपण नीट काम करत नाही, असे सांगून आरोपी अनेक वेळा तिला मारहाण करत असायची. मात्र, मंगळवारपर्यंत तिने मारहाणीची तक्रार केली नाही. कारण काम करण्यास उशीर केल्यामुळे आरोपीने परत अत्याचार करण्यास सुरुवात केली होती. सोमवारी रात्री जेव्हा तिला तिचे काम पूर्ण करण्यास उशीर झाला. तेव्हा आरोपीने तिच्यावर पुन्हा एकदा अत्याचार करण्यास सुरुवात केली.

तिला स्वत:चे कपडे काढायला लावले आणि नंतर तिचे व्हिडिओ (Video) आणि फोटो काढले, असे पीडित मुलीनी पोलिसांना माहिती दिली आहे. आरोपीने पीडितेला चप्पलने देखील मारल्याचे समजत आहे. ज्यामुळे पीडितेच्या डोक्याला जखम झाली. त्यानंतर ती उपचाराकरिता रुग्णालयात गेली आणि जेव्हा तिच्या बहिणीने दुखापती विषयी विचारपूस केली तेव्हा तिने घडलेला सर्व प्रकार सांगितला आहे.(25 year old actress has been arrested)

त्यानंतर पीडितेच्या बहिणीने तात्काळ पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दाखल करण्यात आले आहे. तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३२६ आघात, ३५४(बी) महिलेवर प्राणघातक हल्ला किंवा गुन्हेगारी बळाचा वापर आणि भारतीय दंड संहितेच्या ५०४ हेतूपूर्वक अपमान अन्वये एफआयआर नोंदवला आहे. आम्ही आरोपीला अटक केली आहे. तिला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती वर्सोवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक सिराज इनामदार यांनी यावेळी दिली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

SCROLL FOR NEXT