Kalyan Dombivali Shivsena News
Kalyan Dombivali Shivsena News Saam TV
मुंबई/पुणे

Shivsena Dasara Melava : दसरा मेळाव्यासाठी कल्याण-डोंबिवलीतून दोन्ही गटातले २५ हजार कार्यकर्ते जाण्याची शक्यता

प्रदीप भणगे

डोंबिवली: उद्या, पाच ऑक्टोबरला दसरा सणाच्या दिवशी मुंबईत शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडणार आहे. शिवसेनेच्या राजकीय इतिहासात शिवसेनेचे (Shivsena) प्रथमच दोन मेळावे होणार आहेत. एक ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचा तर, दुसरा शिंदे (Eknath Shinde) गटाचा. असे दोन मेळावे होणार असून दोन्ही गटाकडून यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्यासाठी कल्याण, डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण भागातून सुमारे 25 हजार कार्यकर्ते जाणार असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. (Shivsena Latest News)

शिंदे गटातील डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांनी सांगितले की कल्याण, डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण परिसरातून सुमारे 20 हजार कार्यकर्ते शिंदे गटाच्या बीकेसी येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यात जाणार आहेत. त्यासाठी 600 बसेस बुक केल्याचा दावा त्यांनी केली आहे. बाळासाहेबांच्या विचारांचे सोने तसेच राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हिंदुत्वाचे विचारांचे सोनं लुटण्यासाठी आम्ही जाणार आहोत असे त्यांनी सांगितले आहे.

तसेच ठाकरे गटाकडूनही मोठ्या संख्येने शिवसैनिक दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या वेळेस सुमारे 5 हजार कार्यकर्ते हे लोकलचा प्रवास करुन शिवाजी पार्कात दाखल होणार असल्याची माहीती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांनी दिली आहे.

दसरा मेळाव्यासाठी गर्दीची स्पर्धा

दरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. तर शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे. राज्यातील सत्तासंघर्षानंतर दोन्ही गटांकडून दसरा मेळाव्यासाठी गर्दी जमवण्याची सुरू आहे. महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांना मुंबईत आणण्याची स्पर्धा सुरू आहे.

लहान-मोठ्या अशा एकूण दहा हजार वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये सहा हजार एसटी तसेच खासगी बसगाड्यांचा समावेश आहे. इतिहासात प्रथमच शिवसेनेच्या दोन गटांच्या स्वतंत्र सभा होणार असल्याने गर्दी जमवण्यासाठी कोट्यवधींचा खर्च केला जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने सोमवारी सायंकाळी ५ पर्यंत १८०० एसटी गाड्यांचे आरक्षण केले होते. तीन हजार खासगी गाड्यांचे यापूर्वीच आरक्षण पूर्ण झाले आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटाने १४०० खासगी बस आरक्षित केल्या आहेत.

Edited By - Akshay Baisane.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar News : शैक्षणिक वर्ष आटोपले तरीही शिष्यवृत्ती अर्जाचा तिढा कायम; १० हजार विद्यार्थ्यांचे अर्ज प्रलंबित

Buldhana DJ Banned News : बुलढाणा जिल्ह्यात DJ वाजवण्यास बंदी, 22 डीजेवर पोलिसांकडून कारवाई

वर्ल्डकप संघात स्थान मिळताच स्टार खेळाडूची सुपरफ्लॉप कामगिरी!ठरला राजस्थानच्या पराभवाचं कारण

Vastu Tips: कामाच्या टेबलवर ठेवू नका या वस्तू, नकारात्मकता वाढेल

Today's Marathi News Live : PM मोदींप्रमाणे एकही सुट्टी न घेता काम करतोय - CM एकनाथ शिंदे

SCROLL FOR NEXT