Versova Police Station Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Love Jihad Case: 'तनवीर खानने यश बनून फसवलं, लग्नाचे आमिष दाखवत...', 22 वर्षीय मॉडेलने केला 'लव्ह जिहाद'चा आरोप

Versova Police Station: तन्वीर खानविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात (Versova Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Priya More

सचिन गाड, मुंबई

Mumbai News: मुंबईतल्या वर्सोवामध्ये (Versova) राहणाऱ्या एका मॉडेलने लव्ह जिहादचा दावा केला आहे. 22 वर्षीय मॉडेलने अभिनय आणि मॉडेलिंगचे धडे देणाऱ्यावर बलात्काराचा आरोप लावला आहे. तसंच, धर्म बदलून लग्नासाठी जबरदस्ती केल्याचा आरोप देखील तिने केला आहे. याप्रकरणी तन्वीर खानविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात (Versova Police Station) बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुळची झारखंडच्या रांचीची असलेल्या या मॉडेलने लव्ह जिहादचा दावा केला आहे. मॉडलिंग कपंनीचा संचालक तन्वीर अख्तर खानविरोधात तिने अनेक गंभीर आरोप केले आहेत. तन्वीर खानने आपले नाव यश सांगत मला फसवले आणि लव्ह जिहादची शिकार बनवले. तन्वीरने तिला सतत धर्म बदलून लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली, असा आरोप या मॉडेलने केला आहे.

पीडित मॉडेल आणि तन्वीर खान यांची 2021 पासून ओळख आहे. या मॉडेलने आरोप केला आहे की, 'मार्च 2021 मध्ये गुंगीची औषध देऊन तन्वीरने तिचे आपत्तीजनक फोटो काढले. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने तिच्यावर अनेक वेळा जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. धर्म बदलून लग्न करण्यासाठी दबाव टाकण्यासाठी त्याने हे फोटो माझ्या आई आणि भावाला पाठवले.'

मॉडेलने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत सांगितले की, तन्वीरच्या वागणुकीला कंटाळून तिने रांची सोडून मुंबई गाठली. पण तन्वीरने तिचा पाठलाग करणे सोडले नाही. तन्वीर देखील मुंबईत आला आणि त्याने तिला धर्म परिवर्तन करुन लग्न करण्यासाठी दबाव टाकला. शेवटी या त्रासाला कंटाळून तिने वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.' दरम्यान तन्वीरने मॉडेलच्या आरोपांचे खंडन केले आहे. त्याने उलट मॉडेलवरच फ्रॉड केल्याचा आरोप केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नगरमधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT